चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

युद्धामुळे सोन्याचा भाव वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र सोन्याचा भाव खूपच घसरला आहे. सोनं तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्याचा घसरलेला भाव पाहून सामान्य लोक आनंद व्यक्त करत आहेत.

चांगले दिवस आले रे...सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!
gold and silver rate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2026 | 6:39 PM

Gold Rate : आखाती देशातील सध्याच्या तणावग्रस्त स्थितीमुळे सध्या भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले-वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे उर्जासंकट निर्माण झाले आहे. परंतु सोने आणि चांदीच्या किमतीत मात्र चांगलीच घट होत असताना पाहायला मिळत आहे. सोनं स्वस्त झाल्याने सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. युद्धामध्ये सोन्याचा भाव वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आता सोनं दिवसेंदिवस स्वस्त होत चाललं आहे.

सोन्याच्या भावात नेमका काय बदल झाला?

आकडेवारीत बोलायचे झाल्यास सोने आणि चांदीचा भाव गेल्या एका महिन्यात चांगलाच घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर एका महिन्यापूर्वी म्हणजेच 4 मार्च 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 1.62 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. आता 4 एप्रिल रोजी हाच भाव 1.50 लाख रुपयांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच एका महिन्यात सोन्याचा भाव साधारण 12 हजार रुपयांनी घसरला आहे. चांदीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 4 मार्च 2026 रोजी चांदीचा भाव हा 2.70 रुपये प्रति एक किलो होता. आता हाच भाव 2.35 लाख रुपये प्रति किलोपर्यंत हा भाव घसरला आहे. म्हणजेच एका महिन्यात चांदीचा भाव 35 हजार रुपयांपर्यंत घसरला आहे.

सोन्यात गुंतवणूक करावी का?

सध्या भाव घसरल्याने सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सध्या मात्र जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी पाहता बाजार खूपच संवेदनशील आहे. कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी अभ्यास करणे, योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us