AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

38 वर्षांपूर्वीचं माधुरीचं सुपरहिट गाणं, रस्त्यावरील लोक बनले होते प्रेक्षक, सलग 24 तास चालू होतं शूटिंग, पायातून रक्त येण्याची आलेली वेळ

38 वर्षांपूर्वीच प्रचंड सुपरहिट गाणं. ज्याच्या शूटिंगसाठी माधुरी दीक्षितने 24 तास केलं होतं शूटिंग. शेवटी-शेवटी तिच्या पायातून रक्त येण्याची आली होती वेळ. रस्त्यावरील लोक बनले होते प्रेक्षक.

38 वर्षांपूर्वीचं माधुरीचं सुपरहिट गाणं, रस्त्यावरील लोक बनले होते प्रेक्षक, सलग 24 तास चालू होतं शूटिंग, पायातून रक्त येण्याची आलेली वेळ
| Updated on: Apr 04, 2026 | 6:52 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित ही केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर जबरदस्त डान्स आणि एक्सप्रेशन्ससाठीही प्रसिद्ध आहे. 80-90 च्या दशकात तिच्या प्रत्येक गाण्याने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. विशेषतः 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

या गाण्यातील माधुरी दीक्षितचा एनर्जीने भरलेला डान्स आणि अप्रतिम एक्सप्रेशन्स पाहून प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. त्या काळात थिएटरमध्ये या गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत होता.

शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणी

‘एक दो तीन’ या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी केली होती तर या गाण्याला आवाज अलका याज्ञिक यांनी दिला होता. एका मुलाखतीत माधुरीने सांगितलं होतं की या गाण्याचं शूटिंग अत्यंत कठीण होतं. सततच्या सरावामुळे आणि शूटिंगमुळे तिच्या पायांमधून रक्त येण्याची वेळ आली होती. जरी प्रत्यक्षात रक्त आलं नसले तरी इतका दमछाक करणारा डान्स होता की तसं होणं शक्य होतं.

या गाण्याला अधिक भव्य बनवण्यासाठी दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी मेहबूब स्टुडिओ पूर्णपणे प्रेक्षकांनी भरून टाकला होता. सुरुवातीला काही ज्युनियर आर्टिस्ट होते, पण नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही आत बोलावण्यात आलं. त्यामुळे गाण्यात खऱ्या प्रेक्षकांची एनर्जी दिसून आली.

24 तास अखंड शूटिंग

या गाण्याचा शेवटचा दिवस सर्वात आव्हानात्मक होता. संपूर्ण गाणं पूर्ण करण्यासाठी माधुरी दीक्षितने जवळपास 24 तास सलग शूटिंग केलं. सकाळी साडेदहा वाजता हे शूट संपलं. प्रचंड थकवा असूनही तिने शूट पूर्ण केलं. थकव्यामुळे क्लोजअप शॉट्सऐवजी लॉन्ग शॉट्स घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे हे आयकॉनिक गाणं पूर्ण झालं.

आज तब्बल 38 वर्षांनंतरही ‘एक दो तीन’ या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. माधुरी दीक्षित हिचा हा डान्स आजही बॉलिवूडमधील सर्वात लक्षात राहणाऱ्या गाण्यांपैकी एक मानला जातो. तिच्या मेहनतीमुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजंच आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?