
30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. देशात सोन्याची मागणी वाढली आहे. जागतिक बाजारातील तेजीमुळे देशाची राजधानीत सोन्याची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे राज्यात जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी कालावधीत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 2026 मध्ये सोने 1 लाखांवर जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता, मात्र तो मोडून काढत सोन 2025 या वर्षातच लाखांच्या पार गेल आहे.
प्रमुख शहरातील भाव काय
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत एका दिवसात 1650 रुपये वाढून 99,800 रुपयांपेक्षा अधिक पोहचली आहे. यामध्ये सराफा बाजारातील मेकिंग चार्ज आणि जीएसटीचा समावश नाही. या किंमती एकत्र केल्या तर सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
दिल्लीत 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 93,050 रुपये तर 24 कॅरेट सोने 1,01,500 रुपयांच्या घरात जाऊन पोहचले आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 92,900 रुपयांवर तर 24 कॅरेट सोने 1,01,350 रुपयांवर विक्री होत आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 92,900 रुपयांवर तर 24 कॅरेट सोने 1,01,350 रुपयांवर पोहचले आहे.
जळगावमध्ये सोन्याची मोठी भरारी
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी कालावधीत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 2026 मध्ये सोने 1 लाखांवर जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता मात्र तो मोडून काढत सोन 2025 या वर्षातच लाखांच्या पार गेल आहे.
गेल्या सहा वर्षांचा अभ्यास केला तर 10 टक्क्यापर्यंत सहा टक्क्यांपर्यंत सोन्याचे दर हे वाढत होते. पण यावेळी दहा दिवसातच दहा टक्क्यांपर्यंत सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं सुद्धा ही पहिलीच वेळ आहे. एका वर्षात सोन्याचे दर हे जवळपास 25 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी आणि चांगली गोष्ट आहे..
सोने-चांदीची किंमत सारखीच
घरात लग्न असलेल्या ग्राहकांव्यतिरिक्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली असून सोनं मोड करून नफा कमविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सोन्या आणि चांदीच्या दारातला जो फरक होता तो आतापर्यंत 70 टक्के 80 टक्के असा रेशो होता. मात्र हा फरक आता सारखाच झाला असून सोन्या आणि चांदीचा दर सारखाच असल्याचा सुद्धा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. गेल्या वर्षी रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे, ती आजपर्यंत वेगाने सुरू असल्यामुळे सोनं वर्षभरातच लाखांच्या पार गेल्याचं सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
दागिन्यांच्या हौसेवर पाणी
जळगावात सोन्याचे दर 1 लाख पार झाल्यामुळे आता दागिन्यांची हौस पूर्ण करता येणार नाही अस मत महिलांनी गृहिणींनी व्यक्त केलं आहे. एवढे झपाट्याने कधी सोन्याचे दर वाढतील असा विचार आणि कल्पनाच केलेली नव्हती. मात्र अचानक भाव वाढल्याने बजेट कोलमडले असल्याचे महिलांनी सांगितले. लग्न असलेल्या तरुणीने तर आता भाव वाढल्यामुळे मला लग्नात कमी सोनं मिळणार असून पाहिजे तशी हौस लग्नात होणार नसल्याची खंत बोलून दाखवली.