Gold Rate Today : सोमवारी सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती वाढल्या की कमी झाले दर ? जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत..

Gold Rate Today 10 August Latest News Updates in Marathi : गेल्या आठवड्याभरात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत जवळपास 8000 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीचे दरही चढेच होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सराफा बाजारात मोठ्या घडामोडी घडत असून, आज सोन्याचे दर कमी झालेत की वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार, चला जाणून घेऊया.

Gold Rate Today : सोमवारी सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती वाढल्या की कमी झाले दर ? जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत..
आज सोन्याचे दर वाढले की कमी झाले ?
| Updated on: Aug 10, 2026 | 8:43 AM

श्रावण सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून लवकरच आता लगबग सुरू होईल. मंगळागौर, विविध सण, मग गणपती … त्यानंतरही सणांचे दिवस पुढे असून यानिमित्ताने अनेकांन सजायला, नटायला आवडतं. सण म्हटले की एक उत्साह मनात आणि वातावरणात भरून राहतो, त्याचसोबत दाग-दागिने आलेच, लग्नसराईचा मौसमही आता सुरू होईल. त्यामुळे विविध दागिने खरेदीला ग्राहक उत्सुक असतील. बहुतांश लोकांना सोनं-चांदीचे दागिने घालायला आवडतात, पण सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बरेच चढउतार होत असून त्यामुळे रोजचे सोन्याचे भाव किती, दर काही कमीझाले का याकडे ग्राहकांच लक्ष असतं. तुम्हालाही जर सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर आधी आजचे देशभरातील प्रमुख शहरातील दर नक्की जाणून घ्या. ऑगस्टच्या दुसऱ्या सोमवारी,म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात (Gold Rate) काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार सुरू असून, आज देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, गेल्या आठवड्याचा आढावा घेतला तर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

राजधानी दिल्लीमध्ये 10 ऑगस्टच्या सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,540 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,39,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,340 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,39,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 4,336.02 डॉलर प्रति औंस इतका आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील हालचालींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

आठवडाभरात सोन्याने दिला मोठा परतावा

आज सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी मागील आठवडा सोन्यासाठी चांगला ठरला . गेल्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 8,180 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली असून, या कालावधीत 22 कॅरेट सोने सुमारे 7,600 रुपयांनी महागलं होतं. सोन्याच्या किमतीवर देशांतर्गत मागणीसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम होत असतो.

देशांतील काही प्रमुख शहरातील सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक पाहायला मिळतो. 10 ऑगस्ट रोजी उपलब्ध दरानुसार—

दिल्ली: 24 कॅरेट – 1,52,540 रुपये; 22 कॅरेट – 1,39,840 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई: 24 कॅरेट – 1,52,340 रुपये; 22 कॅरेट – 1,39,640 रुपये प्रति 10 ग्रॅम

कोलकाता: 24 कॅरेट – 1,52,340 रुपये; 22 कॅरेट – 1,39,640 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई: 24 कॅरेट – 1,51,630 रुपये; 22 कॅरेट – 1,39,000 रुपये प्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 139840 152540
मुंबई 139640 152340
अहमदाबाद 139740 152440
चेन्नई 138990 151630
कोलकाता 139640 152340
हैदराबाद 139640 152340
जयपुर 139840 152540
भोपाळ 139740 152440
लखनऊ 139840 152540
चंदीगड 139840 152540

चांदीचे दर किती ?

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज काहीशी नरमाई दिसून येत आहे. 10 ऑगस्टच्या सकाळी चांदीचा भाव 2,44,900 रुपये प्रति किलो इतका होता. मात्र, गेल्या आठवड्याचा विचार केला तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात चांदीचा भाव 10 हजार रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात हालचाल सुरू आहे. सध्या स्पॉट सिल्व्हरचा भाव 63.29 डॉलर प्रति औंस इतका आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us