AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : इराण-अमेरिकेने युद्ध विरामाची घोषणा करताच 3 तासात…, सराफा बाजारात मोठी घडामोड, सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

Gold Price Today 08 April 2026 Latest News Updates in Marathi: इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवांपासुन सतत वरखाली होणाऱ्या सोन्याच्या दरात आज चांगलीच उसळण पहायला मिळाली आहे. आज सोन्याचे भाव किती ?

Gold Price Today : इराण-अमेरिकेने युद्ध विरामाची घोषणा करताच 3 तासात…, सराफा बाजारात मोठी घडामोड, सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट
सोन्याच्या दरात उसळण
| Updated on: Apr 08, 2026 | 10:04 AM
Share

Gold price surge : महिन्याभरापेक्षा अधिक काळ इराण वि. अमेरिका-इस्त्रायल युद्ध सुरू होतं, ज्याचा चटका अख्ख्या जगाला बसला. जागितक तणा, अशांतता याचे पडसाद जागतिक बाजारावरही दिसले आणि सोनं-चांदी या मौल्यवान धातूंचे दर वायूवेगाने वर-खाली होत होते. मात्र काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत इराण-अमेरिकेत युद्धविराम झाल्याचे सांगितले. इराण-अमेरिका सीजफायरमुळे सोन्याच्या बाजारात नवचैतन्य आले आहे. दोन्ही देशांनी दोन आठवडे, 14 दिवसांच्या सशर्त युद्धविरामाला सहमती दर्शवल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला, यामुळे बुधवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. मात्र, असं असलं तरी शस्त्रबंदी किती काळ टिकेल याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेच.

सोन्याच्या किंमतीत जोरदार उसळण

स्पॉट गोल्डचे दर 2.3% वाढून 4,811.66 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकी गोल्ड फ्यूचर्स 3.3 टक्क्यांनी वाढून त्यांचा दर 4,840.20 डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी मंगळवारी सकाळी सोन्याच्या दरात सुमारे 1.2 टक्क्यांची वाढ झाली होती. गुंतवणूकदारांना दिलासा देणाऱ्या अचानक आलेल्या बातमीनंतर बाजारात ही तेजी आली.

ट्रम्पच्या विधानाने बदललं वातावरण

अमेरिकेने इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणकडून अमेरिकेला 10 -कलमी प्रस्ताव मिळाला आहे, जो वाटाघाटींसाठी एक मजबूत आधार मानला जाऊ शकतो असंही त्यांनी नमूद केलं. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल,, असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता. पण आता परिस्थिती नरम पडत असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानची भूमिका आणि चर्चेची तयारी

या संपूर्ण घडामोडीत पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतरच अमेरिकेने वाटाघाटी पुढे नेण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी दिला. ‘मिडल ईस्ट आय’च्या एका अहवालानुसार, अमेरिकेसोबतची चर्चा 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये सुरू होऊ शकते, असं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने म्हटलं होतं. मात्र याचा अर्थ युद्ध संपलं असा होत नाही , असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.

पुढे काय होणार परिणाम ?

तज्ञांच्या मते, ही वाढ म्हणजे एकाप्रकारने “सुटकेची प्रतिक्रिया” आहे. जर इराणने कराराच्या अटींचे पालन केले नाही, तर बाजारात पुन्हा अनिश्चितता येऊ शकते. ऊर्जा किमतींमधील चढ-उतारामुळे महागाईचा धोका निर्माण होतो. बॅरन्सच्या एका अहवालानुसार, जर तेलाच्या पुरवठ्यावर दीर्घकाळ परिणाम झाला, तर अमेरिकेतील महागाई 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकते.

या वर्षाच्या सुरुवातीला सोनं प्रचंड तेजीत होतं, सोन्याचे दर 2 लाखांच्या पार केले होते, मात्र 28 फेब्रुवारी इराण -अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर सोनं 8 टक्क्यांहून अधिक घसरले. आता, सोन्यात आलेली ही तेजी टिकेल की केवळ एक तात्पुरता दिलासा ठरेल, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदी वधारलं

अमेरिका – इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांनी तर चांदीचा दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपये इतके आहेत. सोन्या आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?