
Gold-Silver Price Today: नवीन वर्षापूर्वीच सोन्याचा बाजारात तेजी दिसून आली आहे. 12 डिसेंबर रोजी सकाळी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा उसळी दिसली. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार धास्तावले. दिल्ली आणि मुंबईसह इतर मोठ्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.30 लाखांच्या पार गेला आहे. तर चांदीने पण कहर केला आहे. नवीन वर्षात आता सोने आणि चांदी महाग होईल की स्वस्त असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
सोन्याची किंमत काय?
goodreturns.in नुसार, 12 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,910 रुपयांनी वाढले. आज सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,32,810 रुपये इतका आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचा भाव सातत्याने वधारला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,750 रुपयांनी वाढला आहे. 1,21,750 रुपये असा भाव आहे.
चांदी 15,000 रुपयांनी महाग
या चार दिवसात चांदीने मोठी भरारी घेतली आहे. चांदी 15,000 रुपयांनी महागली आहे. काल चांदी दोन हजार रुपयांनी उतरली आहे. तर आज सकाळच्या सत्रात चांदीच भाव 3,000 रुपयांनी वाढला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 2,04,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीत दरवाढीचे तुफान आले आहे. 24 कॅरेट सोने 1,30,569 रुपये, 23 कॅरेट 1,30,046, 22 कॅरेट सोने 1,19,601 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 97,927 रुपये, 14 कॅरेट सोने 76,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,92,781 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याच्या किंमती का वाढत आहे?
गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकने व्याज दरात 0.25% कपात केली आहे. व्याज दरात कपात झाल्यावर गुंतवणूकदार सुरक्षीत पर्यायासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवतात. जागतिक बाजारातील घडामोड, डॉलरचा चढउतार आणि इतर अनेक गोष्टींमुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचा सांगण्यात येत आहे.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.