Sovereign Gold Bond: मोठा परतावा, सॅव्हरेन गोल्ड बाँडचा धमाका, 2954 रुपये गुंतवणुकीवर इतक्या पट रिटर्न, तुम्ही मालामाल होणार
Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम सुवर्ण रोख्यातून मोठ्या कमाईची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. या योजनेत 2954 रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रति युनिट 12,801 रुपये परतावा मिळेल. हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

Gold Return: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी सार्वभौम सुवर्ण रोख्याच्या (Sovereign Gold bond) दोन जुन्या मालिकेसाठी प्रति युनिट 12,801 रुपयांचे परतावा मूल्य (redemption value) निश्चित केले आहे. ही राशी त्या गुंतवणूकदारांना मिळेल, ज्यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या या योजनेत SGB 2017-18 सीरीजमध्ये गुंतवणूक केली होती. ज्या लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली होती. त्यांना चांगला परतावा मिळाला आहे.
आरबीआयनुसार, त्यावेळी गुंतवणूकदारांनी एक युनिटसाठी 2,954 रुपये गुंतवणूक केली. आता या योजनेला आठ वर्षे पूर्ण झाली असून या गुंतवणुकीवर 12,801 रुपये प्रति युनिट परतावा देण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत गुंतवणूकदारांना 2.5% वार्षिक व्याज पण देण्यात आले आहे. सॉवरेन गोल्ड बाँडची हे खास वैशिष्ट्ये आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना सोन्याच्या वाढत्या किंमतींचा फायदा मिळाला. तर त्यावरील व्याज सुद्धा मिळाले आहे.
फिजिकल गोल्ड खरेदी, म्हणजे दुकानात जाऊन ठोक सोनं घेण्याची सवय कमी व्हावी यासाठी सॅव्हरेन गोल्ड बाँड योजना केंद्र सरकार आणि आरबीआयने यासाठी सुरु करण्यात आली. भारत हा सर्वाधिक सोने आयात करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोन्यासाठी मोठी रक्कम खर्च होते. त्यासाठी देशाची गंगाजळी वापरली जाते. तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना बाँडच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल सोने गुंतवणूक वाढवणे हा त्यामागील हेतू होता. या योजनेमुळे सोने जतन करण्याची गरज नाही. तसेच या योजनेत परताव्यासोबत व्याजही मिळते.
आता नवीन योजना कधी?
आर्थिक वर्ष 2023-24 च्या Sovereign Gold Bond योजनेची चौथी मालिका आली होती. आता नवीन आर्थिक वर्षात या योजनेत कधी गुंतवणूक करता येईल याविषयीची अपडेट समोर आलेली नाही. या गोल्ड बाँडमध्ये हमखास परतावा मिळतो. तर ऑनलाईन गोल्ड बाँड खरेदी करणाऱ्यांना सवलत पण मिळते. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना पण ही सुविधा मिळते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond Scheme) 2015 मध्ये सुरु केली होती.
