AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rates Today : आली रे आली, सोन्याची गुड न्यूज आली ! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या ताजे दर

Gold Rate Today 18 June 2026 Latest News Updates in Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचं सोनं- चांदीच्या दरावर मोठा परिणाम होतात. आज, गुरूवार 18 जून रोजी 24 कॅरेट , 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया.

Gold Rates Today : आली रे आली, सोन्याची गुड न्यूज आली ! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या ताजे दर
सोन्याचे- चांदीचे दर 18 जूनला किती ?
| Updated on: Jun 18, 2026 | 8:41 AM
Share

Gold Rate Today In India : रुपयाची मजबूती आणि तेजीत असलेला शेअर बाजार यामुळे सोने आणि चांदीची चमक पुन्हा एकदा ओसरली आहे. विशेषतः सोन्याचा विचार करता, सलग तिसऱ्या दिवशी या पिवळ्या धातूची चमक फिकी पडली आहे. या तीन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 440 रुपयांची घट झाली आहे, तर 22-कॅरेट सोने 410 रुपयांनी स्वस्त झालं आहे. यापूर्वी, 15 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 2450 रुपयांची, तर 2-कॅरेट सोन्याच्या दरात 2250 रुपयांची घट झाली होती. आज राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 10 रुपयांची आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांची घट झाली आहे. चांदीचा विचार करता, दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरातही सोन्याप्रमाणेच त घट झाली असून, प्रति किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची कपात झाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात 19 जून रोजी जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि ही प्रक्रिया कशी पुढे जाते यावरच सोने-चांदीच्या किमतींची पुढील वाटचाल अवलंबून असेल. विश्लेषकांच्या मते, या दोन देशांमधील चर्चेत प्रगती झाल्यास भू-राजकीय तणाव निवळू शकतो, ज्यामुळे सोने आणि चांदीसारख्या ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानल्या जाणाऱ्या पर्यायांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. याउलट, जर वाटाघाटींमध्ये अडथळे आले किंवा तणाव वाढला, तर गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे वळू शकतात.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

भारतातील प्रमुख शहरांममधील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धचा असलेल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय ते जाणून घेऊया…

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 
दिल्ली ₹1,51,240 ₹1,38,640 ₹1,13,460
मुंबई ₹1,51,090 ₹1,38,490 ₹1,13,310
कोलकाता ₹1,51,090 ₹1,38,490 ₹1,13,310
चेन्नई ₹1,53,050 ₹1,40,290 ₹1,17,490
बंगळुरू ₹1,51,090 ₹1,38,490 ₹1,13,310
हैदराबाद ₹1,51,090 ₹1,38,490 ₹1,13,310
लखनऊ ₹1,51,240 ₹1,38,640 ₹1,13,460
पाटणा ₹1,51,140 ₹1,38,540 ₹1,13,360
जयपुर ₹1,51,240 ₹1,38,640 ₹1,13,460
अहमदाबाद ₹1,51,140 ₹1,38,540 ₹1,13,360

चांदीही खाली घसरली

चांदीच्या बाबतीत सांगायचे तर, सलग दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली आहे. यापूर्वी, 15 जून रोजी दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या दरात प्रति किलो 5000 रुपयांची वाढ झाली होती. मात्र, आज दिल्लीत प्रति किलो दरात 100 रुपयांची घट होऊन चांदीचा दर 2,64,900 रुपयांवर पोहोचला आहे. इतर प्रमुख महानगरांबंद्दल बोलायचं झालं तर मुंबई आणि कोलकातामध्येही याची विक्री त्याच दराने होत आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीची किंमत 2,74, 900 रुपये इतकी आहे; म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान