AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today | सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, आठवडाभरात 1300 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

जर आपण आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. भारतीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

Gold Price Today | सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, आठवडाभरात 1300 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर...
सोने-चांदी दर
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 28, 2021 | 12:06 PM
Share

मुंबई : जर आपण आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. भारतीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. बुधवारी, कमकुवत जागतिक संकेतांमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या (Gold Rate) किंमती 0.55 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीतही घसरण दिसत आहे. एमसीएक्सवर मे वायदा चांदीच्या किंमती (Silver Rate) 1.34 टक्क्यांनी घसरल्या आहेत. या आठवड्यात सोन्याची किंमत 1300 रुपयांनी स्वस्त झाली आहे (Gold Silver Price Today 28 April 2021 MCX Rates).

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on MCX ) : एमसीएक्सवर बुधवारी (28 एप्रिल) जून वायदा सोन्याचे भाव घसरले आहेत. व्यवसायादरम्यान, सोन्याचे दर 262 रुपयांनी घसरले आणि 47,041 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. गेल्या सत्रातही सोन्याचे भाव 0.35 टक्क्यांनी घसरले होते.

चांदीची नवीन किंमत (Silver Price on MCX) : त्याचप्रमाणे एमसीएक्सवरील मे वायदा चांदीची किंमत 923 रुपयांनी घसरून 68,035 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात चांदीचा दर 0.3 टक्क्यांनी घसरला होता.

या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी झाले स्वस्त!

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत दोन महिन्यांच्या उच्चांकी अर्थात 48,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली होती. जागतिक दरामध्ये घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पादनातील किंचित वाढ आणि डॉलर निर्देशांकातील वाढ यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

स्पॉट सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी घसरून 1,767.76 डॉलर प्रति औंस झाले आहेत. त्याच वेळी चांदी 0.9 टक्क्यांनी घसरून 26 डॉलर प्रति औंस झाली (Gold Silver Price Today 28 April 2021 MCX Rates.

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता.

परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले (Gold Silver Price Today 28 April 2021 MCX Rates).

विक्रमी उच्चांकापेक्षा 9000 रुपये स्वस्त

सध्या सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली असली, तरी ती अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपये कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या लाटेने सोन्याच्या किंमतींमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव 56000च्या पातळीवर गेले होते, ते आता घसरून प्रति दहा ग्रॅम 47 ते 48,000 पर्यंत खाली आले आहे.

सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून

सोन्याची किंमत ठरविणार्‍या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.

(Gold Silver Price Today 28 April 2021 MCX Rates)

हेही वाचा :

खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, थेट एमडी, सीईओवर होईल परिणाम

डॉक्टर आणि नर्सेसना मोफत हवाई सफर; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

Follow Us
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना