Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

Gold Price Today 30 May 2026 Latest News Updates in Marathi : परदेशी बाजारांमधील वाढत्या किमती, अमेरिका आणि इराण यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता, तसेच लग्नसराईच्या काळात चांगल्या मागणीच्या अपेक्षेमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींना चालना मिळाली. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे.

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच..  तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट
30 मे रोजी तुमच्या शहरात सोन्याचे भाव किती ?
| Updated on: May 30, 2026 | 8:47 AM

देशांतर्गत सोन्याच्या किमतींमधील चढउतार कायम असून आज मात्र सोन्याची घसरण थांबली आहे. शनिवारी सकाळी सोन्याचे भाव पुन्हा वाढले. 30 मे रोजी सकाळी, राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,800 वर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,650 इतका आहे. परदेशी बाजारातील मजबूत भाव, अमेरिका आणि इराण यांच्यात लवकर करार होण्याची शक्यता आणि लग्नसराईच्या काळात चांगल्या मागणीची अपेक्षा यांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावांना चालना मिळाली. अवघ्या एक दिवसापूर्वी, दिल्ली सराफा बाजारात 99.9 क्के शुद्ध सोन्याचा भाव 1600 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 62,900 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,530.72 डॉलर आहे. आज सोन्याचा भाव वाढल्यामुळे ग्राहकांची धास्ती वाढली,

देशातील महत्वाच्या शहरातील सोन्याचे भाव

दिल्लीमध्ये २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,800 रुपये आहे. 22 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,660 आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,510 आहे, तर 24-कॅरेट सोन्याची किंमत 1,57,650 रुपये आहे. चेन्नईमध्ये भाव सर्वाधिक आहेत. 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,59,290 रुपये आहे. 22 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,46,010 आहे. पुणे आणि बंगळूरमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,650 रुपये असून, 22-कॅरेट सोन्यासाठी 1,44,510 रुपये मोजावे लागतात.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹) 24कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹)
दिल्ली 144660 157800
मुंबई 144510 157650
अहमदाबाद 144560 157700
चेन्नई 146010 159290
कोलकाता 144510 157650
हैदराबाद 144510 157650
जयपुर 144660 157800
भोपाळ 144560 157700
लखनऊ 144660 157800
चंदीगड 144660 157800

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 30 मे रोजी सकाळी चांदीचा भाव2,80,100 रुपये प्रति किलोग्राम होता. चांदीचा आंतरराष्ट्रीय स्पॉट भाव 75.52 डॉलर प्रति औंस होता. आदल्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून 2,74,700 रुपये प्रति किलोग्राम झाला होता. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव होत असतो.

 

Follow Us