Gold Silver Price Today | सराफा बाजारात सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा आजचे दर…

नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सराफा बाजारात सोने आणि चांदीला झळाळी मिळाल्याचे चित्र दिसले.

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सराफा बाजारात सोने आणि चांदीला झळाळी मिळाल्याचे चित्र दिसले. सध्या लग्नसराई सुरू असून, सोन्या चांदीला प्रचंड मागणी चांगली आहे. गेल्या 18 ते 20 दिवसांपासून दररोज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price)चढउतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात जास्तीत जास्त 500 रुपयांनी प्रतितोळे वाढ होत असून एवढेच दर कमी होत आहेत. सुवर्ण नगरी जळगावात आज सोन्याच्या भाव 52,800 प्रति तोळा तर चांदी 72,182 प्रति किलो इतका आहे (Gold Silver Price Today 5 January 2021 Maharashtra Mumbai, jalgaon latest rate and update).

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या गुंतवणुकीबाबत संभ्रम असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे सराफा व्यापारांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार, गुंतवणुक करताना सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदी-विक्रीला प्राधान्य देत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे भाव अस्थिर आहेत.

मुंबईतील सोन्या-चांदीचा दर

आज मुंबईत सोन्याचा भाव जळगावप्रमाणेच काहीसा आणखी वधारलेला दिसला. गुड रिटर्न्सच्या रिपोर्टनुसार,  मुंबईत आज सोन्याचा दर 50,230 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 70 हजार 200 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

गेल्या पाच दिवसांतील सोने-चांदी (Gold Silver Price) दर (मुंबई)

5 जानेवारी

सोने – 50, 230 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,200 रुपये प्रति किलो

4 जानेवारी

सोने – 50,220 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,300 रुपये प्रति किलो

3 जानेवारी

सोने – 50,060 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,120 रुपये प्रति किलो

2 जानेवारी

सोने – 50,050 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,130 रुपये प्रति किलो

1 जानेवारी

सोने – 49,940 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,100 रुपये प्रति किलो

(Gold Silver Price Today 5 January 2021 Maharashtra Mumbai, jalgaon latest rate and update)

सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात

जगभरातील असंख्य धातूंमध्ये सोन्याला फार जास्त मागणी असते. सर्वसामान्य लोकांपासून विविध गुंतवणूकदारांची नजर ही सोन्याच्या भावावर असते. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण वर्षातून एकदा तरी सोने खरेदी करतात. गोल्ड हबने जाहीर केलेल्या सोने खरेदीच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षात म्हणजे 2020मध्ये कोरोना काळात गुंतवणूकदारांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली. 2020मध्ये गुतंवणूकदारांनी तब्बल 1130 टन सोन्याची खरेदी केली. मात्र 2020 या वर्षात सर्वसामान्य लोकांनी केवळ 572 टन सोन्याची खरेदी केली होती.

(Gold Silver Price Today 5 January 2021 Maharashtra Mumbai, jalgaon latest rate and update)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI