AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…

सोने खरेदीमध्ये गुंवणूक करण्याचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत आहे. सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे.

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर...
gold silver price
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 18, 2021 | 1:33 PM
Share

मुंबई : सोने खरेदीमध्ये गुंवणूक करण्याचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत आहे. सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दारात काहीशी वाढ झालेली दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याच्या किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा दर 49, 558 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 69,700 रुपये प्रति किलो इतका आहे (Gold Silver Price Today on 18 January 2021 Maharashtra Mumbai pune latest rate and updates).

कोरोनाच्या जीवघेण्या (Corona Vaccination) संसर्गानंतर आता लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घट (Gold Silver price fall) झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

जळगाव सराफा बाजार – आठवडाभरातील सोन्याचे भाव (प्रति ग्रॅम)

11 जानेवारी – 5 हजार 1 रुपये

12 जानेवारी – 5 हजार 1 रुपये

13 जानेवारी – 5 हजार 20 रुपये

14 जानेवारी – 5 हजार 16 रुपये

15 जानेवारी – 4 हजार 993 रुपये

16 जानेवारी – 4 हजार 954 रुपये

17 जानेवारी – 5 हजार 30 रुपये

18 जानेवारी – 4 हजार 956 रुपये

मुंबईतील सोन्या-चांदीचा दर :

जळगावच्या तुलनेत मुंबईत मात्र आज सोन्याचा आणि चांदीचा भाव आणखी घसरलेला पाहायला मिळाला. मुंबईत सोन्याचा दर 48,890 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 65,500 रुपये प्रति किलो इतका आहे (Gold Silver Price Today on 18 January 2021 Maharashtra Mumbai pune latest rate and updates).

नागपूरमधील सोन्या-चांदीचा दर :

गुड रिटर्न्सच्या रिपोर्ट नुसार नागपुरात जळगाव आणि मुंबईच्या तुलनेत सोन्याचा आणि चांदीचा दर गडगडलेला दिसला आहे. नागपुरात आज (18 जानेवारी) सोन्याचा दर 47,890 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 65,500 रुपये प्रति किलो इतका आहे.

पुण्यातील सोने-चांदी दर :

मुंबई-नागपूर प्रमाणेच पुण्यातही सोन्या-चांदीचा दर उतरलेला पाहायला मिळाला. पुण्यात आज (18 जानेवारी) सोन्याचा दर 48,890 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 65,500 रुपये प्रति किलो इतका आहे.

मागणीला गती येणार (World Gold Council)

वर्ल्ड गोल्ड काऊंन्सिलच्या (World Gold Council) म्हणण्यानुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे सन 2020च्या उत्तरार्धात सोन्याची मागणी कमी झाली आणि यामुळे किमती देखील उतरतीला आल्या आहेत. परंतु, लवकरच सोन्याची मागणी वाढणार आहे. जर मागणीत तेजी आली, तर किंमत देखील वाढेल. जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक भारत आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 11 जानेवारीला MCX वर सोन्याची किंमत 48 हजार 786 रुपये प्रति तोळा होती. तर यापूर्वी 1 तोळा सोन्याची किमंत 48 हजार 967 रुपयावर बाजार बंद झाला होता. म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 265 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.

(Gold Silver Price Today on 18 January 2021 Maharashtra Mumbai pune latest rate and updates)

हेही वाचा :

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!