Gold Price Today | सोन्याच्या किंमतीची मोठी उसळी, पटापट जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोमवारी (3 मे) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीचे दर वाढत्या दराने व्यापार करत होते.

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीची मोठी उसळी, पटापट जाणून घ्या आजचे नवे दर
सोने-चांदी भाव
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 1:39 PM

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच व्यापाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate Today) वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोमवारी (3 मे) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीचे दर वाढत्या दराने व्यापार करत होते. एमसीएक्सवरील 10 ग्रॅम जून वायदा सोन्याच्या किंमतीत (Gold rate) 0.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मे वायद्याच्या चांदीच्या (Silver Rate) एक किलोच्या किंमतीत 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे (Gold Silver Price Today on 3 May 2021 MCX rate).

सोन्याचा भाव (Gold Price MCX) : सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  जून वायदा सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 47,007 रुपयांवर व्यापार करत आहे. स्पॉट गोल्ड प्रति औंस 1770.6 डॉलरवर व्यापार करत आहे.

चांदीचा भाव (Silver Price MCX) : एमसीएक्सवरील चांदीचा वायदा दर 401 रुपयांनी वाढून 67925 रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत औंस 25.90 डॉलर होती.

गेल्या एका आठवड्यात सोने 1,015 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तथापि, संपूर्ण एप्रिल महिन्यात या दरामध्ये 2,602 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या किंमत 60 हजारांच्या पुढे जाणार!

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील कोरोना संकटामुळे अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लॉकडाऊन होणार की नाही, अशी भीती लोकांना अजूनही आहे. त्याचबरोबर दुसरीकडे महागाई देखील वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत या घटकांचा परिणाम सोन्याच्या दरावर होणार आहे.

याच कारणामुळे पुढील 5-6 महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते. अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पसंती देतात (Gold Silver Price Today on 3 May 2021 MCX rate).

सोन्यात चढ-उतार का?

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 4 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याला पाठिंबा मिळालाय. या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन बॉन्ड यील्डच्या सोन्याच्या भावात वाढ झाली असून, सेप-हेवन मालमत्तेला धक्का बसलाय. परंतु अमेरिकी बाँडच्या उत्पन्नातील कमकुवतपणा आणि अमेरिकन डॉलरच्या नरमपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या.

दागिन्यांची मागणी वाढली

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च 2020 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची एकूण मागणी 39 टक्क्यांनी वाढून 102.5 टन झाली. एका वर्षापूर्वी ते 73.9 टन होते, जर आपण या किमतीबद्दल बोललो तर दागिन्यांची मागणी मागील वर्षीच्या 27,230 कोटी रुपयांच्या तुलनेत 58 टक्क्यांनी वाढून 43,100 कोटी रुपये झाली.

(Gold Silver Price Today on 3 May 2021 MCX rate)

हेही वाचा :

SBIआजासून ‘या’ लोकांच्या खात्यात 2489 कोटी पाठवणार, वाचा नेमकं कारण ?

Retirement Planning | सेवानिवृत्तीनंतर आपणही होऊ शकता करोडपती; अशाप्रकारे करा पैशांचे नियोजन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.