Gold and Silver Rates : 100 वर्षांपूर्वी किती होता सोन्या-चांदीचा भाव ? किंमत ऐकून तर…
शेअर बाजारातील घसरणीमुळे गेल्या काही महिन्यांत सोनं आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 100 वर्षांपूर्वी सोनं आणि चांदीचे भाव काय होते ते जाणून घेऊया.

आजकाल, कमोडिटी मार्केटमध्ये मोठी तेजी दिसत आहे. जागतिक तणाव वाढत असतानाच आता सोनं आणि चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. या दोन्हींचे भाव दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत. गेल्या वर्षी दोन्ही कमोडिटीजसाठीही एक उत्तम वर्ष होते. फक्त एका वर्षात चांदीच्या किमती 160 टक्क्यांनी वाढल्या. सोन्याच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाल्याचे सर्वांनीच पाहिलं. पण आजपासून शतकभरापूर्वी, म्हणजेच 100 वर्षांपूर्वी, 1925 साली सोनं आणि चांदीची किंमत किती होती तुम्हाला माहिती आहे का ? त्याचप्रमाणे, ज्या सोन्याच्या 10 ग्रामसाठी आपल्यालाल जवळपास 1.42 लाख मोजावे लागत आहे, त्याची किंमत 100 वर्षांपूर्वी किती होती?
सोनं हे नेहमीच एक सुरक्षित संपत्ती मानलं जातं, पूर्वीपासूच सोन्याबद्दल ही धारणा आहे. घरातील महिला सोन्याचे दागिने करून वापरतात आणि गुंतवणूक म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत काळानुसार नक्कीच बदलली आहे. मात्र, त्याची मागणी आणि मूल्य काही कमी झालेलं नाही. आजही सोने तेजस्वीपणे चमकताा दिसत आहे. पूर्वी लोक फक्त दागिने आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक करायचे, परंतु आता ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे देखील एक ट्रेंड बनला आहे. सिल्व्हर (चांदी) ईटीएफने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 100 वर्षांपूर्वी याच सोन्याचे चांदीचे भाव किती होते ते जाणून घेऊया.
100 वर्षांपूर्वी सोन्या-चांदीचे भाव
1925 साली सोन्याची किंमत प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅमसाठी 18.75 रुपये होती. तर 1926 साली ही किंमत प्रति 10 ग्रॅम 18.43 रुपये होती. मात्र, त्यानंतर सुमारे पाच वर्षे सोन्यावर दबाव राहिला. उदाहरणार्थ, 1927-28 मध्ये किंमत 18.37 रुपये होती आणि 1930 साली ती 18.5 रुपये झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात जानेवारी 1925 मध्ये सोन्याचा भाव 20.72 डॉलर होता. जानेवारी 1926 मध्ये चांदीचा भाव 0.62 डॉलर होता.

आज किती सोन्या-चांदीची किंमत ?
ऐतिहासिक आकडेवारीवरून असं दिसून येतं की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत, परंतु त्या अजूनही त्यांनी उच्च पातळीवर गाठली आहे. स्पॉट मार्केटमध्ये, 25 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव सध्या 1 लाख 43 हजार 860 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे, 1 किलो चांदीचा भाव 2 लाख 85 हजार 890 रुपये असा आहे. दरम्यान, वायदे बाजारात 5 मार्च3036 एक्सपायर होणाऱ्या करारासह सोन्याची किंमत 1 लाख 43 हजार 295 आहे. 5 फेब्रुवारी रोजी कालबाह्य होणाऱ्या चांदीची किंमत 2 लाख 84 हजार 901 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.