AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 1 August 2024 : चांदीची दमदार बॅटिंग, 10 ग्रॅम सोने झाले महाग, मौल्यवान धातूच्या काय किंमती सराफा बाजारात

Gold Silver Rate Today 1 August 2024 : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी महागले. काल चांदीने तुफान बॅटिंग केली. तर सोने महागले. मौल्यवान धातूने दरवाढीची आघाडी उघडली. सारफा बाजारात आता काय आहे 10 ग्रॅम सोन्याची किंमत?

Gold Silver Rate Today 1 August 2024 : चांदीची दमदार बॅटिंग, 10 ग्रॅम सोने झाले महाग, मौल्यवान धातूच्या काय किंमती सराफा बाजारात
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Aug 01, 2024 | 8:27 AM
Share

सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात मोठी कपात केल्याने मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. बजेटनंतर आणि पूर्वी पण दोन्ही धातूत घसरण होती. आता मात्र सोने आणि चांदी पुन्हा दरवाढीच्या अश्वावर आरूढ झाली आहे. चांदीने काल 2,000 रुपयांची उसळी घेतली. तर सोन्यात पण दरवाढ झाली. या आठवड्यात गेल्या तीन दिवसात भावात चढउतार दिसून आला. आता काय आहेत बेशकिंमती धातूचा भाव? (Gold Silver Price Today 1 August 2024 )

सोन्याची तुफान बॅटिंग

सोने गेल्या दहा-बारा दिवसांपासून उतरणीवर होते. भावात घसरण सुरु होती. अर्थसंकल्पानंतर तर मोठी घसरण नोंदवण्यात आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने 270 रुपयांनी वधारले. मंगळवारी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. तर महिन्याच्या अखेरीस 31 जुलै रोजी सोन्याने 870 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली भरारी

बजेटपूर्वी आणि नंतर चांदीत विक्रमी घसरण झाली. गेल्या आठवड्यात किंमत 7 हजारांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात सोमवारी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी तितकीच घसरण झाली. तर महिन्याच्या अखेरीस 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची आघाडी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,309, 23 कॅरेट 69,031, 22 कॅरेट सोने 63,487 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,982 रुपये, 14 कॅरेट सोने 40,546 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 82,974 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना