AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 11 August 2024 : सोने आणि चांदीत महागाई, असे वधारले भाव आठवड्याच्या अखेरीस, ग्राहकांच्या खिशाला लागली कात्री

Gold Silver Rate Today 11 August 2024 : आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने भरारी घेतली. गेल्या दोन दिवसांत सोन्याने चांगलीच मजल मारली. तर चांदीने अखेरच्या सत्रात महागाईला गवसणी घातली. सराफा बाजारात आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 11 August 2024 : सोने आणि चांदीत महागाई, असे वधारले भाव आठवड्याच्या अखेरीस, ग्राहकांच्या खिशाला लागली कात्री
सोने चांदी किंमत सोने चांदी भाव
| Updated on: Aug 11, 2024 | 8:31 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या अखेरच्या सत्रात फटका दिला. सोन्याने या दोन दिवसात मोठी मजल मारली. तर पाठोपाठ चांदीने पण महागाईला गवसणी घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली होती. रविवारी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीच्या झळा बसतील. बेशकिंमती धातूच्या या भरारीनंतर सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमती? (Gold Silver Price Today 11 August 2024 )

सोन्याने घोडे दामटले

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात नरमाईचे सत्र दिसले. सुरुवातीच्या चार दिवसांत सोने 1300 रुपयांनी उतरले. पण अखेरच्या दोन दिवसांत सोन्याने घोडे दामटले. भाव हजार रुपयांनी वधारले. 6 ऑगस्टला 870 रुपयांनी तर 7 ऑगस्टला 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 8 ऑगस्टला भाव स्थिर होता. 9 ऑगस्टला सोन्याने दिशा बदलली. 820 रुपयांची मुसंडी मारली. 10 ऑगस्टला त्यात 220 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची घौडदौड

या आठवड्यात चांदी 4200 रुपयांनी उतरली होती. पण अखरेच्या सत्रात चांदीने 1600 रुपयांची घौडदौड केली. 5 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. 6 ऑगस्टला भाव 3200 रुपयांनी उतरले. त्यानंतरच्या दोन दिवसांत किंमती हजार रुपयांनी कमी झाल्या. शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी चांदी 1500 रुपयांनी तर 10 ऑगस्ट रोजी 100 रुपयांनी किंमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69663, 23 कॅरेट 69,384, 22 कॅरेट सोने 63,811 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,247 रुपये, 14 कॅरेट सोने 40,753 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,263 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना