AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 11 September 2024 : सोन्याची उसळी, चांदीची दमदार बॅटिंग; उत्सवाच्या काळात काय आहेत भाव तरी?

Gold Silver Rate Today 11 September 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. गणपती आणि ज्येष्ठा गौरीच्या आगमनाने घरोघरी चैतन्य पसरले आहे. त्यात आज मौल्यवान धातूने चांगलीच भरारी घेतली आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 11 September 2024 : सोन्याची उसळी, चांदीची दमदार बॅटिंग; उत्सवाच्या काळात काय आहेत भाव तरी?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Sep 11, 2024 | 4:22 PM
Share

गणेशोत्सवासह ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले आहे. राज्यातील घरा-घरात चैतन्य पसरले आहे. सोन्या-चांदीच्या आघाडीवर चढउताराचे सत्र सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोने आणि चांदीत मोठा फेरबदल दिसला नाही. अनेक दिवस तर भावात कोणताच बदल दिसला नाही. त्यानंतर सणावार जसे जवळ येत गेले. तसा या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउतार दिसून आला. या आठवड्यात मंगळवारी भाव घसरला तर आज बुधवारी किंमतीत एकदम उसळी आली. काय आहे आता सोने आणि चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 11 September 2024 )

स्वस्ताईनंतर सोन्याची उसळी

मागील आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 550 रुपयांची झेप घेतली होती. सोमवारी 9 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. तर 10 सप्टेंबर रोजी किंमतीत घसरण दिसली. सोने 440 रुपयांनी उतरले. त्यानंतर आज बुधवारी सोने 380 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी सुसाट

गेल्या काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण झाली होती. या आठवड्यात चांदीने दरवाढीचा मुहूर्त साधला. सोमवारी 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांची वाढली. 10 सप्टेंबर रोजी किंमती 1 हजार रुपयांनी तर 11 सप्टेंबर रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. तीन दिवसांत चांदी दोन हजार रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,590, 23 कॅरेट 71303, 22 कॅरेट सोने 65,576 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,693 रुपये, 14 कॅरेट सोने 41,880 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 82,207 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा