AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : ग्राहकांना मोठा दिलासा, सोने-चांदीची स्वस्ताई

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली. मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. गेल्या 15 दिवसांत दोन्ही धातूंनी अनेक उच्चांक मोडीत काढले. त्यामुळे ग्राहकांना ऐन लग्नसराईत खरेदीचा विचार पुढे ढकलावा लागला. आता इतके कमी झाले भाव...

Gold Silver Rate Today : ग्राहकांना मोठा दिलासा, सोने-चांदीची स्वस्ताई
| Updated on: Dec 12, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमती गेल्या 15 दिवसांत गगनाला भिडल्या. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदीच्या किंमती वाढल्या. गेल्या आठवड्यात या दरवाढीला ब्रेक लागला. या आठवड्याची सुरुवात या मौल्यवान धातूच्या घसरणीने झाली. किंमतीत मोठी घसरण झाली. सोने-चांदीत अजून घसरण अपेक्षित आहे. विवाह सोहळ्यात सोन्याला मान आहे. किंमतीत घसरण झाली, तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीत चढउतार झाले. आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 12 December 2023) अशा आहेत.

सोन्याच्या किंमतीत घसरण

या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी, 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती 220 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचे भाव झाले कमी

या आठवड्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा. गेल्या आठवड्यातील घसरणीचा ट्रेंड अजून कायम आहे. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. 7 डिसेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,452 रुपये, 23 कॅरेट 62,206 रुपये, 22 कॅरेट सोने 56,290 रुपये झाले. 18 कॅरेट 46,089 रुपये, 14 कॅरेट सोने 35,949 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,402 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना