AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्याची लगीनघाई, चांदी माघारी फिरली, किंमती काय

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरवाढीला या आठवड्यात ब्रेक लागला. दोन दिवसांत किंमतीत जवळपास 1500 रुपयांपर्यंत घसरण झाली. चांदीत ही आपटी बार पहायला मिळाला. सोन्याने पुन्हा उचल खाली आहे. तर चांदीत घसरण दिसून आली. सोने पूर्वीच्या किंमतीवर यावे, यासाठी अनेक ग्राहकांनी देव पाण्यात ठेवले आहे. वधू पित्याला अधिक चिंता लागलेली आहे.

Gold Silver Rate Today : सोन्याची लगीनघाई, चांदी माघारी फिरली, किंमती काय
| Updated on: Dec 08, 2023 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : या आठवड्यात सोने-चांदीच्या अनेक दिवसाच्या तेजीला ब्रेक लागला. सलग दोन दिवस किंमतीत घसरण आली. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतल्याने वधू पिता चिंतेत होते. सोन्याने लांबचा पल्ला गाठल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण 5 आणि 6 डिसेंबर रोजी दोन्ही धातूत कमालीची घसरण झाली. त्याचा फायदा ग्राहकांना झाला. गुरुवारी सोन्यात किंचित वाढ झाली. तर चांदीत घसरणीचे सत्र सुरुच आहे. सोने-चांदीच्या किंमती अजून कमी होण्याची अनेकांची इच्छा आहे. पण बाजारातील घडामोडी त्यासाठी सध्यातरी अनुकूल दिसत नाहीत. आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 8 December 2023) अशा आहेत.

दरवाढीचा विक्रम

  • सराफा बाजारात सोने 65 हजारांच्या पुढे गेले होते
  • यावर्षात 4 मे 2023 रोजी सोने सर्वात महाग होते
  • 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती
  • 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि पुढे नवीन रेकॉर्ड झाले
  • 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,281 रुपयांवर पोहचले
  • चांदी 76,430 रुपये किलोवर पोहचली
  • इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार हे भाव आहेत

सोन्यात किंचित वाढ

या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने घसरले. 5 डिसेंबर रोजी सोने 1000 रुपयांनी घसरले. तर 6 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. आता सोन्याने किंचित उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 3300 रुपयांनी उतरली

या आठवड्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा. चांदीत मोठी घसरण दिसून आली. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. 7 डिसेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,462 रुपये, 23 कॅरेट 62,212 रुपये, 22 कॅरेट सोने 57,215 रुपये झाले. 18 कॅरेट 46,847 रुपये, 14 कॅरेट सोने 36,540 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,888 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती