AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 December 2024 : सोन्याची तीनच दिवसात 2 हजारांची भरारी, तर चांदी पडली फिक्की, काय आहेत भाव तरी?

Gold Silver Rate Today 12 December 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याला झळाळी आली आहे. तर चांदीला दरवाढीचा सूर काही गवसलेला नाही. दोन्ही धातुत चढ उताराचे सत्र आहे. या आठवड्यात सोन्याने दमदार बॅटिंग केली आहे. तर चांदीत नरमाईचा सूर आहे.

Gold Silver Rate Today 12 December 2024 : सोन्याची तीनच दिवसात 2 हजारांची भरारी, तर चांदी पडली फिक्की, काय आहेत भाव तरी?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Dec 12, 2024 | 8:34 AM
Share

लग्नसराईत सोन्याने या आठवड्यात दमदार बॅटिंग केली. सोने महाग झाले. गेल्या तीन दिवसात सोन्याने जवळपास दोन हजारांचा पल्ला गाठला आहे. गेल्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात सोन्याचा भाव उतरला होता. तर चांदीत नरमाईचे सत्र होते. या आठवड्यातही चांदीला मोठी मजल मारता आलेली नाही. जागतिक बाजारात आणि सोने-चांदीच्या वायदे बाजारात पण या दोन्ही धातुनी कमाल केली आहे. डिसेंबरसाठीचा सोन्याच्या वायद्यात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याची झळाळी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम लवकरच भारतीय बाजारात दिसून येईल. या दोन मौल्यवान धातुची आता अशी आहे किंमत (Gold Silver Price Today 12 December 2024 )

सोन्याची तडाखेबंद खेळी

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने तडाखेबंद खेळी खेळली. मागील आठवड्यात सोन्याची किंमत 900 रुपयांची स्वस्त झाल्या होत्या. तर 540 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात सोन्याने दमदार खेळी खेळली. सोमवारी 9 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी, 10 डिसेंबर रोजी 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सुद्धा मौल्यवान धातुत वाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा उलटा गिअर

मागील आठवड्यात चांदी 1 हजारांनी महागली तर 500 रुपयांनी भाव कमी झाला होता. तर या आठवड्यात चांदी 10 डिसेंबर रोजी 4500 रुपयांनी वधारली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,666, 23 कॅरेट 77,355, 22 कॅरेट सोने 71,142 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,250 रुपये, 14 कॅरेट सोने 45,435 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,700 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?