AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजार नाही तर येथे पैशांचा छापखाना; गुंतवणूकदारांची सोन्यासारखी कमाई, तुम्ही ट्राय केले की नाही?

Share Market Investors : शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. काही दिवस तेजीच्या लाटेवर स्वार होणार शेअर बाजार अचानक धडाम आपटल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूक वाढावी आणि फायदा वाढवण्यासाठी आता या ठिकाणी बड्या गुंतवणूकदारांनी पैसा ओतला आहे.

शेअर बाजार नाही तर येथे पैशांचा छापखाना; गुंतवणूकदारांची सोन्यासारखी कमाई, तुम्ही ट्राय केले की नाही?
गोल्ड ईटीएफ
| Updated on: Dec 11, 2024 | 3:59 PM
Share

शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. काही दिवस तेजीचे आणि मग एकदाच मोठा फटका बसत असल्याने गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांवर लक्ष केंद्रीत केले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकड्यांनुसार, गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या दरम्यान गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. एका वर्षात सोन्यातील गुंतवणूक तिप्पट झाली आहे. सोन्याच्या दागिन्यात नाही तर गोल्ड ईटीएफमध्ये (Gold ETF) गुंतवणूक वाढली आहे. फिजिकल सोन्यापेक्षा ऑनलाईन गुंतवणूक वाढली आहे. त्याचा फायदा पण दिसून आला आहे.

काय सांगते आकडेवारी?

AMFI च्या आकड्यावर नजर टाकली तर ही बाब स्पष्ट होते. या एका वर्षात 1,256 कोटींचा गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यात आला. तर गेल्यावर्षी हा आकडा 333.37 कोटी रुपये इतका होता. मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहाय्यक संचालक हिमांशु श्रीवास्तव यांच्या मते, गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये फायदा शोधत आहेत.

आतापर्यंत 25,409 कोटींची गुंतवणूक

जानेवारी 2020 पासून आतापर्यंत गोल्ड ईटीएफमध्ये एकूण 25,409 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा शेअर बाजाराकडून ईटीएफकडे वळालेला ट्रेंड दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत कमी रक्कम जमा झाली. तर जास्त रक्कम काढण्यात आली. याचा अर्थ सोने महाग झाल्यावर गुंतवणूकदारांनी विक्री केली तर किंमती घसरल्यावर खरेदी वाढवली. आता लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याचे दाग-दागिने, आभुषणांची खरेदी वाढली आहे.

पेपर गोल्डचा जबरदस्त पर्याय

सध्या गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी पेपर गोल्ड हा एकदम जबरदस्त पर्याय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांकडे काय काय पर्याय आहेत. तर डिजिटल गोल्डमध्ये ग्राहकांसमोर सॉव्हेरिन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय आहेत.

गोल्ड ETF चा पर्याय

गोल्ड ईटीएफ सारखे फंड तुम्हाला मालामाल करू शकतात. नियमित शेअर अथवा स्टॉक एक्सचेंजवर तुम्ही व्यापार करू शकतात. गोल्ड ETF खरेदीसाठी तुमच्याकडे डीमॅट खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या निप्पॉन इंडिया गोल्ड ETF, HDFC गोल्ड ETF अथवा ICICI प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ सारखे लोकप्रिय गोल्ड ईटीएफ बाजारात आहेत. तुम्ही स्वतः ऑनलाईन सर्च करून अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करू शकता.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल