AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | ग्राहकांना खरेदीची ‘सुवर्ण’संधी! चांदीने ओढवली नाराजी, जाणून घ्या किंमतीतील चढउतार

Gold Silver Rate Today 13 February 2024 | सोन्याने गेल्या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. तर चांदी वधारली होती. या आठवड्याची सुरुवात पण घसरणीने झाली. सोन्यात घसरण झाली. तर चांदीचा तोरा कायम आहे. चांदीने उसळी घेतली आहे. आता असा आहे सोन्या-चांदीचा भाव?

Gold Silver Rate Today | ग्राहकांना खरेदीची 'सुवर्ण'संधी! चांदीने ओढवली नाराजी, जाणून घ्या किंमतीतील चढउतार
| Updated on: Feb 13, 2024 | 8:44 AM
Share

नवी दिल्ली | 13 February 2024 : सोने या आठवड्यात घसरले तर चांदी लकाकली आहे. सोन्याने या महिन्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. चांदी दोन आठवड्यापासून सातत्याने उसळी घेत आहे. बजेटनंतर दोन्ही धातू भरारी घेतील हा अंदाज पण फोल ठरला. चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात एकदाच 180 रुपयांची दरवाढ झाली होती. चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली तर एकदाच 500 रुपयांनी वधारली होती. या आठवड्याची सुरुवात चढउताराने झाली आहे. कसा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 13 February 2024)

सोन्याने दिला मोठा दिलासा

या 13 दिवसांमध्ये सोने जवळपास 830 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात 510 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. 7 फेब्रुवारी सोने 180 रुपयांनी महागले. 9 फेब्रुवारीला 20 तर 10 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी वधारली

या 13 दिवसात चांदी 1200 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी उतरली. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने घसरले आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,301 रुपये, 23 कॅरेट 62,052 रुपये, 22 कॅरेट सोने 57,067 रुपये झाले. 18 कॅरेट 46,725 रुपये, 14 कॅरेट सोने 36,446 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,140 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
Lalbag Cha Raja : अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...