AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 13 March 2025 : सोने-चांदीचे जमके धुलीवंदन, महागाईचे उधळले रंग, तुमचा खिसा कापल्या जाणार

Gold Silver Rate Today 13 March 2025 : सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला महागाईचे रंग उधळले आहे. यामुळे महागाईचे दहन होणार नसून ग्राहकांचा खिसा कापल्या जाणारे हे स्पष्ट होत आहे. 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 13 March 2025 : सोने-चांदीचे जमके धुलीवंदन, महागाईचे उधळले रंग, तुमचा खिसा कापल्या जाणार
सोने आणि चांदी वधारलेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 13, 2025 | 8:22 AM
Share

ऐन सणासुदीच्या उत्साहावर सोने आणि चांदीने पाणी फेरले आहे. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले. मौल्यवान धातुच्या किंमती उतरल्याने महागाईचे होळीत दहन होत असल्याचे चित्र होते. पण काल अचानक या बेशकिंमती धातुनी मोठी उसळी घेतली. सोने आणि चांदीने जमके रंग उधळले. मंगळवारी दोन्ही धातुत मोठी घसरण दिसून आली. तर बुधवारी किंमती उसळल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...(Gold Silver Price Today 13 March 2025 )

सोने झाले महाग

गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही सोन्यात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. तर मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोन्याने 490 रुपयांची भरारी घेतली. आज सकाळच्या सत्रात महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखाच्या घरात

या आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली. सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. तर बुधवारी चांदी एकाच दिवशी 2 हजारांनी उसळली. सकाळच्या सत्रात महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,100 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,143, 23 कॅरेट 85,798 22 कॅरेट सोने 78,907 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,607 रुपये, 14 कॅरेट सोने 50,394 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,100 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...