AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 13 September 2024 : आनंदवार्ता आली सणासुदीत, आता जमके करा खरेदी, दमदार बॅटिंगनंतर स्वस्त झाले सोने-चांदी

Gold Silver Rate Today 13 September 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने दमदार बॅटिंग केली. सणासुदीत मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. पण आता या धातू्च्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. काल दुपारच्या सत्रातच ग्राहकांना दिलासा मिळाला.

Gold Silver Rate Today 13 September 2024 : आनंदवार्ता आली सणासुदीत, आता जमके करा खरेदी, दमदार बॅटिंगनंतर स्वस्त झाले सोने-चांदी
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Sep 13, 2024 | 9:52 AM
Share

देशभरात सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तर गणेशोत्सव, महालक्ष्मी यांच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले आहेत. या काळात खरेदी करण्याच्या उत्साहावर मात्र दरवाढीने पाणी फेरले गेले. मौल्यवान धातूच्या खरेदीला ब्रेक लागला. देवांसाठी दागिने खरेदीसाठी ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागली. पण काल दुपारनंतर दोन्ही धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. तीन दिवसांच्या दमदार बॅटिंगनंतर या धातूत घसरण दिसून आली. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 13 September 2024 )

सोन्यात आली स्वस्ताई

ऐन सणासुदीत सोने चमकले. सोन्यात दरवाढ झाली. 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. तर 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा भाव उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या घौडदौडीला लागला ब्रेक

या आठवड्यात चांदीने दमदार कामगिरी बजावली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वाढली. 10 सप्टेंबरला 1 हजारांनी चांदी महागली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर 12 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,801, 23 कॅरेट 71514, 22 कॅरेट सोने 65,770 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,851 रुपये, 14 कॅरेट सोने 42,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,188 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा