AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्याने मरगळ झटकली, चांदी इतकी वधारली, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 15 March 2024 | गेल्या तीन दिवसांपासून धाप लागलेल्या सोन्याने पु्न्हा एकदा उचल खाल्ली आहे. तेजीला या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रेक लागला होता. तीन दिवसांत सोने वधारले नाही. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात भाव वधारले तर चांदीने उसळी घेतली.

Gold Silver Rate Today | सोन्याने मरगळ झटकली, चांदी इतकी वधारली, अशा आहेत किंमती
सोन्याची उसळी, चांदी वधारलीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 15, 2024 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 15 March 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. तेजीच्या तुफान पहिला ब्रेक लागला. सोमवार ते बुधवार किंमती वाढल्या नाहीत. उलट त्यात घसरण झाली. चांदीने पण ग्राहकांना दिलासा दिला. पण आठवड्याच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी पुन्हा उचल खाल्ली. किंमतीत पुन्हा वाढ झाली. गेल्या आठवड्यात किंमतींनी कहर केला होता. 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीत तुफान तेजी आली. परिणामी ग्राहकांना अजूनही चढ्या दरानेच मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 15 March 2024)..

  1. सोन्याने घेतली उसळी – मार्च महिन्यात, सुरुवातीला दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वधारले. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीची 1800 रुपयांची भरारी – या महिन्यात सुरुवतीला दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी वधारली. या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. तर 14 मार्च रोजी 1800 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी उतरले. 24 कॅरेट सोने 65,523 रुपये, 23 कॅरेट 65,261 रुपये, 22 कॅरेट सोने 60,019 रुपये झाले.18 कॅरेट 49,142 रुपये, 14 कॅरेट सोने 38,331 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,781रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!