AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 15 September 2024 : सोने विक्रमाला गवसणी घालणार? चांदी पण सुसाट, आता किंमती काय?

Gold Silver Rate Today 15 September 2024 : सोने आणि चांदीची तुफान बॅटिंग बघता हे दोन्ही धातू लवकरच नवीन विक्रमाला गवसणी घालतील, असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. बजेटपूर्वी दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन विक्रम नोंदवला होता. सीमा शुल्क कपातीच्या निर्णयानंतर दोन्ही धातूत स्वस्ताई आली होती.

Gold Silver Rate Today 15 September 2024 : सोने विक्रमाला गवसणी घालणार? चांदी पण सुसाट, आता किंमती काय?
सोने आणि चांदी नवीन रेकॉर्ड करणार?
| Updated on: Sep 15, 2024 | 8:47 AM
Share

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली. तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. ऑगस्टच्या अखेरच्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला होता. आता सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 15 September 2024 )

सोन्यात 500 रुपयांची वाढ

या आठवड्यात सोन्यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली. आठवड्याच्या सुरुवातीला सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. 13 सप्टेंबर रोजी त्यात 130 रुपयांची भर पडली. काल किंमतीत बदल दिसला नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, सोने लवकरच विक्रमाला गवसणी घालू शकते. सोन्याने यावर्षात 77,000 रुपयांचा रेकॉर्ड केला आहे. तर चांदीने 87 हजारांचा टप्पा ओलांडला होता. या सणासुदीत हा विक्रम तुटण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी झेप

चांदी या आठवड्यात 5 हजारांनी महागली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी, 10 सप्टेंबर रोजी 1 हजारांनी तर 11 सप्टेंबरला 500 रुपयांनी चांदी वधारली. 13 सप्टेंबर रोजी या धातूने 3,000 रुपयांची उसळी घेतली. तर 15 सप्टेंबर रोजी किंमती पुन्हा 2,500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळच्या सत्रात एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...