AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 16 January 2025 : पडझडीनंतर सोने-चांदीची तुफान बॅटिंग; खरेदीला जाण्यापूर्वी खिसा ठेवा गरम

Gold Silver Rate Today 16 January 2025 : सोने-चांदीने मकर संक्रांतीला दरवाढीचा पतंग उडवला. सणासुदीला भाव वधारण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण त्यानंतर पडझड झाली. आता किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 16 January 2025 : पडझडीनंतर सोने-चांदीची तुफान बॅटिंग; खरेदीला जाण्यापूर्वी खिसा ठेवा गरम
सोने-चांदीच भाव काय?
| Updated on: Jan 16, 2025 | 8:32 AM
Share

नवीन वर्षात सोने-चांदीने मोठी झेप घेतली आहे. आता महिन्याच्या मध्यापर्यंत या दोन्ही धातुचा तोरा दिसून आला आहे. मौल्यवान धातुच्या किंमतीत मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी त्याची वसूली झाली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. सणासुदीला भाव वधारण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण त्यानंतर पडझड झाली. आता किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… (Gold Silver Price Today 16 January 2025 )

सोन्याची तुफान झेप

मागील दोन आठवड्यात सोन्याने तुफान बॅटिंग केली. तर या आठवड्यात सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 तारखेला त्यात 110 रुपयांची घसरण झाली. तर 15 जानेवारी रोजी 110 रुपयांनी किंमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

या महिन्यात चांदीने मोठी भरारी घेतली. चांदी जवळपास 5 हजारांनी वधारली. तर या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. 14 तारखेला त्यात दोन हजारांची घसरण झाली. तर 15 जानेवारी रोजी चांदी एक हजार रूपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,424, 23 कॅरेट 78,110 22 कॅरेट सोने 71,836 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,818 रुपये, 14 कॅरेट सोने 45,878 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,550 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक