AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीच्या घसरणीला ब्रेक! ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

Gold Silver Rate Today 17 February 2024 | गेल्या दोन महिन्यांपासून सोने आणि चांदीत आठवड्याच्या शेवटी आणि सुरुवातीला दरवाढीचा पॅटर्न दिसून येत आहे. या आठवड्यात पण हाच ट्रेंड दिसला. आता आठवड्याच्या शेवटी घसरणीला ब्रेक लागला. सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. काय आहेत आता भाव, जाणून घ्या...

Gold Silver Rate Today | सोने-चांदीच्या घसरणीला ब्रेक! ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ
| Updated on: Feb 17, 2024 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 17 February 2024 : सोने-चांदीत या आठवड्याच्या शेवटी दरवाढ झाली. त्यापूर्वी घसरणीचे सत्र होते.  डिसेंबर महिन्यांच्या उच्चांकानंतर जानेवारीपासून आतापर्यंत सोने-चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. सोने-चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. मौल्यवान धातूत अनेकदा मोठी घसरण दिसून आली आहे. बुधवारी तर सोन्यामध्ये 800 रुपयांची घसरण दिसली. तर चांदीत 14 फेब्रुवारीला 1500 रुपयांनी भाव उतरले होते. गेल्या आठवड्यात पण सोने-चांदीत मोठी घसरण दिसून आली होती. आता दोन्ही धातूने उसळी घेतली आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 17 February 2024)

  1. सोन्याची किंमत वधारली – या आठवड्यात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले. त्यात बुधवारी 680 रुपयांच्या घसरणीची भर पडली. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. तर 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची स्वस्ताई आली. 15 फेब्रुवारी रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. त्यानंतर आता सोने 200 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदी वधारली – या महिन्यात चांदी 1700 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी स्वस्त झाली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. तर 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,600 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. बुधवारी 24 कॅरेट सोने 61,743 रुपये, 23 कॅरेट 61,496 रुपये, 22 कॅरेट सोने 56,557 रुपये झाले. 18 कॅरेट 46,307 रुपये, 14 कॅरेट सोने 36,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,922 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  4. किंमती मिस्ड कॉलवर – 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला