AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 17 January 2025 : सोन्याचा वारू उधळला, चांदीची गरूड झेप, मौल्यवान धातुची किंमत काय?

Gold Silver Rate Today 17 January 2025 : या आठवड्यात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. एकच दिवस किंमती उतरल्या. सुरूवातीला आणि आता अखेरच्या टप्प्यात दोन्ही धातुनी मोठी झेप घेतली. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 17 January 2025 : सोन्याचा वारू उधळला, चांदीची गरूड झेप, मौल्यवान धातुची किंमत काय?
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Jan 17, 2025 | 8:32 AM
Share

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने आणि चांदीने दमदार कामगिरी केली आहे. सुरूवातीपासूनच दोन्ही धातुनी जोरदार फटकेबाजी केली. एकूणच या 15 दिवसात दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. त्यानंतर भाव उतरला. आता बेशकिंमती धातुत पुन्हा वाढ झाली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव आता असा आहे. (Gold Silver Price Today 17 January 2025 )

या आठवड्यात हजारी झेप

या आठवड्यात आतापर्यंत सोन्याने एक हजार रुपयांच्या घरात झेप घेतली. सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 जानेवारी रोजी 110 रुपयांची घसरण झाली. तर 15 जानेवारी रोजी 110 रुपयांनी किंमत वाढली. 16 जानेवारी रोजी 550 रुपयांनी किंमती भडकल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 3 हजारांनी उसळली

या महिन्यात चांदीने मोठी भरारी घेतली. चांदी जवळपास 6 हजारांनी वधारली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. 14 तारखेला त्यात दोन हजारांची घसरण झाली. 15 जानेवारी रोजी चांदी एक हजारांनी तर 16 जानेवारी रोजी 2 हजार रूपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,184, 23 कॅरेट 78,867, 22 कॅरेट सोने 72,533 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,388 रुपये, 14 कॅरेट सोने 46,323 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,784 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...