AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोन्याचा ग्राहकांना दिलासा; चांदीची 2600 रुपयांची झेप, काय आहेत अपडेट

Gold Silver Rate Today 17 March 2024 | या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र होते. सोन्याने मोठी मजल मारली नसली तरी चांदीत किलोमागे मोठी पडझड झालीच तशी जोरदार दरवाढ पण झाली. मार्च महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस दोन्ही धातूंनी मोठी चढाई केली होती. त्याला या आठवड्यात ब्रेक लागला. सराफा बाजारात काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोन्याचा ग्राहकांना दिलासा; चांदीची 2600 रुपयांची झेप, काय आहेत अपडेट
सोने आणि चांदीच्या किंमतींची काय अपडेट
| Updated on: Mar 17, 2024 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली | 17 March 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने दरवाढीच्या सत्राला ब्रेक लावला. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत दोन्ही धातूंनी मोठी चढाई केली होती. 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी घौडदौड केली.या आठवड्यात दरवाढीच्या सत्राला ब्रेक लागला. या आठवड्यात तीन दिवस सोने घसरले. तर एकदाच दरवाढ झाली. इतर दिवशी भावात बदल झाला नाही. चांदीत मात्र चढउताराचे सत्र दिसून आले. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. आता अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 17 March 2024)..

  1. सोन्याची 250 रुपयांची उसळी – मार्चच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी महागले. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च केवळ 10 रुपयांनी भाव कमी झाला. 13 मार्च रोजी 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी वधारले. 15 मार्च रोजी बदल झाला नाही. तर शनिवारी दहा रुपयांची मामूली घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,740 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीत तुफान वाढ – मार्चच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी वधारली. 11 मार्च रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. 12 मार्च रोजी 500 रुपयांनी भाव वाढले. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपयांची झेप घेतली. 15 मार्च रोजी किंमतीत बदल झाला नाही. 16 मार्च रोजी 300 रुपयांनी दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,300 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागले. 24 कॅरेट सोने 65,559 रुपये, 23 कॅरेट 65,297 रुपये, 22 कॅरेट सोने 60,052 रुपये झाले.18 कॅरेट 49,169 रुपये, 14 कॅरेट सोने 38,352 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,210 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...