AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 18 August 2024 : रक्षाबंधनाअगोदरच सोन्यात मोठी वाढ, तर चांदीने मारली मुसंडी, 10 ग्रॅमसाठी इतका खिसा होणार खाली

Gold Silver Rate Today 18 August 2024 : सणासुदीपूर्वी मौल्यवान धातूत दरवाढ होते हे समीकरण ठरलेले आहे. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. त्याचा फायदा बाजारपेठेला होतो. आता रक्षाबंधनापूर्वीच सोन्याचा तोरा वाढला आहे. तर चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. अशा आहेत दोन्ही धातूच्या किंमती.

Gold Silver Rate Today 18 August 2024 : रक्षाबंधनाअगोदरच सोन्यात मोठी वाढ, तर चांदीने मारली मुसंडी, 10 ग्रॅमसाठी इतका खिसा होणार खाली
रक्षा बंधनापूर्वी सोने आणि चांदीचा भाव वधारला
| Updated on: Aug 18, 2024 | 8:36 AM
Share

उद्या रक्षाबंधन आहे. त्याअगोदरच सोने आणि चांदी महागले आहे. कोणताही सण येण्यापूर्वी मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसते. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. ग्राहक थोडे जास्त पैसे गेले तरी काळजी करत नाहीत. तर काही जण बाजाराचा अंदाज घेऊन खरेदी करतात. काही ग्राहक सणासुदीपूर्वीच खरेदी करतात. ग्राहकांच्या खरेदी मूडवर बाजारपेठेला फायदा होतो. या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने जोरदार बॅटिंग केली आहे. या आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली. तर सोन्याच्या दरात पण वाढ झाली. आता अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 18 August 2024 )

सोने पुन्हा वधारले

या आठवड्याच्या अखेरीस सोन्यात दरवाढीचे सत्र दिसले. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 374 रुपयांनी महागले. बुधवारी त्यात 110 रुपयांची घसरण झाली. 16 ऑगस्टला 110 रुपये आणि 17 ऑगस्ट रोजी 115 रुपयांनी किंमत वधारली. या आठवड्यात सोन्यात 600 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात सोने वधारले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 4 हजारांची मुसंडी

या आठवड्यात चांदी 4,000 रुपयांनी वधारली. 14 ऑगस्ट रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्टला चांदीने 1 हजार रुपयांनी वधारली. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी चांदीत एक हजाराची वाढ झाली. तर 17 ऑगस्ट रोजी चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70604, 23 कॅरेट 70,321, 22 कॅरेट सोने 64,673 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,953 रुपये, 14 कॅरेट सोने 41,303 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,510 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा