AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 February 2025 : सोन्याचा दोनच दिवसात विक्रम, चांदीचे सपशेल लोटांगण, भाव तरी काय?

Gold Silver Rate Today 19 February 2025 : या आठवड्याच्या दोनच दिवसात सोन्याने मोठा विक्रम नोंदवला. दोन दिवसात चमकदार कामगिरी केली. तर चांदी या दोन दिवसात नरमली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 19 February 2025 : सोन्याचा दोनच दिवसात विक्रम, चांदीचे सपशेल लोटांगण, भाव तरी काय?
सोन्याचा विक्रम, चांदीची किंमत काय
| Updated on: Feb 19, 2025 | 10:52 AM
Share

गेल्या दोन दिवसात सोन्याने दमदार कामगिरी केली. सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही धातुनी मोठी चढाई केली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी वधारले. तर 700 रुपयांनी उतरले होते. आता दोनच दिवसात मौल्यवान धातुने ही वसूली केली. तर दुसरीकडे चांदीत मोठा बदल झालेला दिसत नाही. चांदीने लाखावर मुक्काम ठोकला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 19 February 2025 )

सोन्याची मोठी मुसंडी

गेल्या आठवड्यात सोन्याने 1200 रुपयांची उसळी घेतली. तर 700 रुपयांनी धातु स्वस्त झाला. तर या आठवड्यात सोमवारी सोने 550 रुपयांनी तर मंगळवारी 330 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोने मोठी मुसंडी मारेल, असे संकेत मिळत आहेत.

चांदीचा एक लाखावर मुक्काम

5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी तितकीच वाढ चांदीच्या किंमतीत झाली होती. मध्यंतरी आणि नंतर चांदीत नरमाईचे धोरण दिसले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,690, 23 कॅरेट 85,347, 22 कॅरेट सोने 78,492 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,268 रुपये, 14 कॅरेट सोने 50,129 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,023 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय