AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : दरवाढीचा श्रीगणेशा! उसळले सोने-चांदी

Gold Silver Rate Today : बाप्पाच्या आगमनाला सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर दोन्ही धातूंनी चांगलीच उसळी घेतली आहे. या मौल्यवान धातूंच्या किंमतीत इतकी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today : दरवाढीचा श्रीगणेशा! उसळले सोने-चांदी
Image Credit source: वेडिंगवायर
| Updated on: Sep 19, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : दरवाढीच्या सत्राचा या आठवड्यात पण सोने-चांदीने खंड पडू दिला नाही. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी सुरुवात झाली. ती या आठवड्यात कायम आहे. दबाव झुगारत दोन्ही धातूंनी चांगलीच उसळी घेतली आहे. यापूर्वीच्या 15 दिवसांत दोन्ही धातूंमध्ये घसरणीचे सत्र सुरु होते. सोन्यात 800 रुपयांची तर चांदीत 5000 रुपयांची घसरण दिसून आली. आता या दोन्ही धातूंमध्ये चांगलीच उसळी आली आहे. जागतिक बाजारात वातावरण अनुकूल नसले तरी सणा-सुदीत मागणी वाढल्याने भावात वाढीचे सत्र दिसून येते. 15 सप्टेंबरपासून सोने-चांदीत (Gold Silver Price Today 19 September 2023) दरवाढ दिसून येत आहे. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे. या चार दिवसांत दोन्ही धातूंच्या किंमतीत दरवाढ दिसून आली. किती वाढल्या या किंमती?

इतके वधारले सोने

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. पंधरा दिवसांत तर घसरणीचे सत्र सुरु होते. शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी त्याला ब्रेक लागला. त्यापूर्वी सोन्यात जवळपास 800 रुपयांची स्वस्ताई आली होती. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. या चार दिवसांत 550 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 55200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,210 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीत 1000 रुपयांची वाढ

सप्टेंबर महिन्यात चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या पंधरा दिवसांत चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची दरवाढ झाली. तर 18 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,324 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,086 रुपये, 22 कॅरेट सोने 54341 रुपये, 18 कॅरेट 44,493 रुपये, 14 कॅरेट सोने 34,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,212 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना