AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खिशाला कसे परवडणार? काही थांबेना सोने-चांदीची दरवाढ

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा गगन भरारी घेतली. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी ग्राहकांची, खरेदीदारांची नाराजी ओढावून घेतली. सोने आता 65,000 हजारांच्या घरात पोहचते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. चांदी पण या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. पुढील वर्षात आता सोने आणि चांदी नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today : खिशाला कसे परवडणार? काही थांबेना सोने-चांदीची दरवाढ
| Updated on: Dec 02, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : सोने-चांदी अजून काही दिवसांनी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. गेल्या 10-12 वर्षात सोने आणि चांदीचा वेग अचंबित करणारा आहे. आता मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने-चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला. पण सोने-चांदी थांबण्याचे वा माघारी येण्याचे कोणतेच संकेत नाही. एका पाठोपाठ एक नवीन विक्रम दोन्ही धातू नावावर कोरत आहेत. या आठवड्यात 4 मे 2023 रोजीचा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपयांचा रेकॉर्ड इतिहास जमा झाला. तर बुधवारी किंमती 62,629 रुपयांवर होत्या. शुक्रवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये झाला. तर चांदी 76,400 रुपये किलो होती. या दरवाढीने (Gold Silver Price Today 2 December 2023) ग्राहकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.

सोन्याची भरारी

दिवाळीपासून दरवाढीचे सत्र सुरुच आहे. त्याला किंचित ब्रेक लागला. या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले नाही तर नवीन विक्रम पण केले. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली. तर 1 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

2300 रुपयांनी चांदी महाग

गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी महाग झाली. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,728 रुपये, 23 कॅरेट 62,477 रुपये, 22 कॅरेट सोने 57,458 रुपये झाले. 18 कॅरेट 47,046 रुपये, 14 कॅरेट सोने 36,695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 76,400 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?