AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 2 May 2024 : सोन्याने सपाटून खाल्ला मार; चांदीने तर अगोदरच घेतली माघार, भाव तरी काय

Gold Silver Rate Today 2 May 2024 : सोन्यात आपटी बार झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिलच्या अखेरच्या सत्रात सोन्याला मोठी भरारी मारता आली नाही. या आठवड्यात तर मौल्यवान धातूंमध्ये मोठी पडझड झाली. सोने तोंडावर आपटले. तर चांदीने माघार घेतली. अशा आहेत किंमती...

Gold Silver Rate Today 2 May 2024 : सोन्याने सपाटून खाल्ला मार; चांदीने तर अगोदरच घेतली माघार, भाव तरी काय
सोने आणि चांदीच्या दरवाढीचा कहर
| Updated on: May 02, 2024 | 8:40 AM
Share

महाराष्ट्र दिनी स्वस्ताईची सलामी दिल्यानंतर सोने तोंडावर आपटले तर चांदीने माघार घेतली. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याला उंच भरारी घेता आली नाही. तर गेल्या 15 दिवसांत चांदीने दरवाढीला ब्रेक दिला आहे. चांदीत भाववाढीपेक्षा घसरण अधिक दिसून आली. 17 एप्रिलपासून चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता या महिन्याच्या सुरुवातीलाच 1 मे रोजी सोने सपाटून आपटले तर चांदीने पण माघार घेतली. काय आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 2 May 2024)

सोन्यात आपटी बार

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोने 1150 रुपयांनी वधारले. तर त्यात 2400 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. तर 30 एप्रिल रोजी त्यात बदल दिसला नाही. 1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 1000 रुपयांची स्वस्ताई

एप्रिल महिन्याच्या अखेरीस चांदीने दिलासा दिला होता. 17 एप्रिलपासून चांदीने मोठा उलटफेर केलेला नाही. गेल्या आठवड्यात चांदी 2 हजारांनी वधारली. तर 4500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 29 एप्रिल रोजी किंमती स्थिर होत्या. तर 30 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त झाली. 1 मे रोजी त्यात तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. असोसिएशनने अजून किंमती अपडेट केलेल्या नव्हत्या. 24 कॅरेट सोने 71,710 रुपये, 23 कॅरेट 71,423 रुपये, 22 कॅरेट सोने 65,686 रुपये झाले. 18 कॅरेट 53,783 रुपये, 14 कॅरेट सोने 41,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,050 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा