AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने घेतली जोरदार उसळी, अशा वधारल्या या आठवड्यात किंमती

Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोने-चांदीचा आलेख उंचावला. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात आणि सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी चढाई सुरुच होती. दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतल्याने गुंतवणूकदारांना एकाच आठवड्यात मोठा फायदा झाला. अशा वाढल्या किंमती..

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने घेतली जोरदार उसळी, अशा वधारल्या या आठवड्यात किंमती
| Updated on: Sep 02, 2023 | 9:40 AM
Share

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : जागतिक घडामोडी पूर्णपणे अनुकूल घडल्याने सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. हे दोन्ही धातू सध्या सूसाट सुटले आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीने चढाईही सुरुवात केली. त्यात खंड पडला नाही. सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी मात्र त्याला खंड पडला. गुडरिटर्न्सनुसार या दरवाढीला ब्रेक लागला. पण चढउताराचे सत्र सुरुच असते. ऑगस्ट महिन्यात मोठा खाडा पडल्यानंतर सोने-चांदीने दरवाढीचा बिगूल वाजवला. दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतल्याने दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना आणि खरेदीदारांना मोठा फायदा झाला. आता सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीत (Gold-Silver Price Today 2 September 2023) किती वाढ होते, ते समोर येईल. दोन्ही धातूंना फेब्रुवारी आणि एप्रिलसारखा अजूनही रेकॉर्ड करता आलेला नाही. तो रेकॉर्ड सप्टेंबर महिन्यात मोडेल का, हे समोर येईल.

800 रुपयांची वाढ

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीला मध्यंतरी बळ मिळाले नाही. भावात वाढ झाली नाही. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात 110 रुपयांची वाढ झाली. या दिवसात एकूण 860 रुपयांची वाढ झाली. या 22 कॅरेट सोने 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदी पण वधारली

ब्रेकनंतर चांदीने चांगलीच चढाई केली. 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वाढल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. 1 सप्टेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,485 रुपये, 23 कॅरेट 59,247 रुपये, 22 कॅरेट सोने 54,488 रुपये, 18 कॅरेट 44614 रुपये, 14 कॅरेट सोने 34,799 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,645रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा