AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 20 November 2024 : सोने-चांदीचे महागाईला मतदान; दोनच दिवसांत मोठी मुसंडी, आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 20 November 2024 : सोने आणि चांदीने गेल्या आठवड्याची मरगळ झटकून काढली. गेल्या आठवड्यात किंमतीत मोठी घसरण झाली होती. त्याची वसूली या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातुनी केली. दोनच दिवसांत दोन्ही मौल्यवान धातुनी मोठी मुसंडी मारली.

Gold Silver Rate Today 20 November 2024 : सोने-चांदीचे महागाईला मतदान; दोनच दिवसांत मोठी मुसंडी, आता काय आहेत किंमती?
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Nov 20, 2024 | 8:37 AM
Share

मागील आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन्ही मौल्यवान धातुनी गेल्या आठवड्यात नरमाईचा सूर आळवला. सोने 6 हजारांच्या घरात तर चांदी 11 हजारांनी स्वस्त झाली. पण या आठवड्यात दोन्ही धातुनी या नरमाईची वसूली केली. ग्राहकांना या आठवड्यात झटक बसला. अवघ्या दोनच दिवसांत सोन्याने 1200 रुपयांच्या घरात उसळी घेतली. तर चांदीने पण मोठी झेप घेतली. या आठवड्याच्या सुरूवातीला सोने आणि चांदीने महागाईला मतदान केल्याने ग्राहकांचा खिसा कापल्या गेला. सराफा बाजारात अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 20 November 2024 )

सोन्याची मोठी मुसंडी

मागील आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने 1200 रुपयांची वाढ नोंदवली. सोमवारी सोने 660 रुपयांनी महागले तर मंगळवारी त्यात 760 रुपयांची वाढ झाली. आजही सकाळच्या सत्रात या दोन्ही धातुत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,810 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2 हजारांनी वधारली

गेल्या दोन आठवड्यापासून चांदीत नरमाईचा सूर होता. गेल्या आठवड्यात चांदी 5 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. आज सकाळच्या सत्रात चांदीने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,873 23 कॅरेट 75,569, 22 कॅरेट सोने 69,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,905 रुपये, 14 कॅरेट सोने 44,386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,956 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?