AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा भरारी; सराफा बाजारात जाताना खिसा ठेवा गरम

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात दमदार सुरुवात केली आहे. शेअर बाजार चमकला आणि दुपारनंतर घसरला. पण सोने-चांदीची घौडदौड सुरुच आहे. एका आठवड्यापूर्वी रेकॉर्डवर रेकॉर्ड करणाऱ्या मौल्यवान धातूने पुन्हा खेळी खेळली आहे. त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईत खिसा गरम ठेवावा लागणार आहे. त्यांना जादा दाम मोजावे लागू शकतात.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा भरारी; सराफा बाजारात जाताना खिसा ठेवा गरम
| Updated on: Dec 21, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने दहा दिवसांपूर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. दरवाढीच्या बॉम्बने सराफा बाजारात जणू शुकशुकाट होतो की काय अशी परिस्थितीत झाली होती. सोन्याने 65,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने 80 हजारांकडे घौडदौड सुरु केली होती. पण या वेगाला ब्रेक लागला. किंमती खाली आल्या. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली. पण शेवटच्या दिवसात आणि या आठवड्यात दोन्ही धातूंचा जोर कायम आहे. दरवाढ सुरु झाली आहे. सोन्याच्या या खेळीने पुन्हा एकदा ग्राहकांची चिंता वाढली आहे. सोने-चांदी (Gold Silver Price Today 21 December 2023) विक्रमाला गवसणी घालणार का? नवीन विक्रम करणार का, याविषयी तज्ज्ञांच्या मनात संभ्रम असला तरी सोने-चांदीने आगेकूच सुरु ठेवली आहे.

सोन्यात 500 रुपयांची भर

गेल्या आठवड्यात सोने 1100 रुपयांनी वधारले. आठवड्याच्या सुरुवातीला 19 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची झेप घेतली.गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी चमकली

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीने 3500 रुपयांची उसळी घेतली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,302 रुपये, 23 कॅरेट 62,052 रुपये, 22 कॅरेट सोने 57,069 रुपये झाले. 18 कॅरेट 46,727 रुपये, 14 कॅरेट सोने 36,447 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,742 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं