AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 21 February 2025 : सोन्याला केव्हा ब्रेक लागणार? सलग चौथ्या दिवशी किंमती सुसाट, चांदीत चढउतार

Gold Silver Rate Today 21 February 2025 : सोन्याने गेल्या चार दिवसांपासून तुफान फटकेबाजी केली आहे. चार दिवसात सोने जवळपास दोन हजारांच्या घरात वधारले आहे. तर दुसरीकडे चांदीत चढउताराचे सत्र आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 21 February 2025 : सोन्याला केव्हा ब्रेक लागणार? सलग चौथ्या दिवशी किंमती सुसाट, चांदीत चढउतार
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Feb 21, 2025 | 8:29 AM
Share

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट या धोरणासाठी बदलांचा धडका लावला आहे. अनेक देशांचा मदत निधी आटावला अथवा रोखला आहे. त्यात भारताचा पण समावेश आहे. तर व्यापारी आणि व्यावसायिक धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. त्याचे परिणाम जागतिक बाजारात दिसत आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी त्यामुळे मौल्यवान धातुत गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे सोने तळपले आहे. तर चांदीत चढउताराचे सत्र सुरू आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 21 February 2025 )

सोन्याच्या किंमती भडकल्या

गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या किंमती भडकल्या आहेत. सर्व कॅरेटच्या सोन्यात मोठे तुफान आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले. या चार दिवसात सोने 2000 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा कुरघोडी करण्याचे संकेत मिळत आहेत.

चांदीच्या किंमतीत नाही बदल

5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी हजाराची वाढ चांदीने नोंदवली होती. तेव्हापासून चांदीत नरमाईचे धोरण दिसले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,400 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,520, 23 कॅरेट 86,174, 22 कॅरेट सोने 79,252 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,890 रुपये, 14 कॅरेट सोने 50,614 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,789 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप