AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 21 June 2024 : अखेरच्या टप्प्यात सोने-चांदीची उसळी; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ, भाव तरी काय

Gold Silver Rate Today 21 June 2024 : गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने उसळी घेतली होती. या आठवड्यातही तोच पॅटर्न दिसून आला. मौल्यवान धातू्च्या किंमतीत मोठी वाढ झाली.

Gold Silver Rate Today 21 June 2024 : अखेरच्या टप्प्यात सोने-चांदीची उसळी; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ, भाव तरी काय
सोने उसळले, चांदीची मुसंडी
| Updated on: Jun 21, 2024 | 8:28 AM
Share

वटसावित्रीनिमित्त पत्नीला जर एखादा दागिना गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर खिशाला झळ बसू शकते. सोने आणि चांदीच्या किंमतीत आठवड्याच्या शेवटी उसळी आली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सोने आणि चांदीने दमदार भरारी घेतली होती. तोच पॅटर्न या आठवड्यातही दिसून आला. मौल्यवान धातूच्या किंमतीत या महिन्यात मोठा बदल झाला नाही. सध्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 21 June 2024 )

सोन्यात झाली वाढ

या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. सोन्याने कोणताही नवीन रेकॉर्ड नावावर केला नाही. 17 जूनला सोने 220 रुपयांनी घसरले. 18 जूनला 100 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. 19 तारखेला किंमती जैसे थे होत्या. तर 20 जूनला 220 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मुसंडी

या आठवड्यात चांदीत चढउतार दिसून आला. 15 जूनला चांदीत 500 रुपयांची दरवाढ दिसली. पुढील दोन दिवसात किंमती स्थिर होत्या. 18 जूनला 500 रुपयांनी किंमती वधारल्या, तर दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. चांदीने 20 जून रोजी 1500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत दरवाढ झाली. 24 कॅरेट सोने 72,164 रुपये, 23 कॅरेट 71,873 रुपये, 22 कॅरेट सोने 66,100 रुपये झाले. 18 कॅरेट 54,122 रुपये, 14 कॅरेट सोने 42,215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,038 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...