AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 December 2024 : सोने-चांदीची स्वस्ताई, आठवड्याच्या अखेरीस अशा कमी झाल्या किंमती

Gold Silver Rate Today 22 December 2024 : गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसली. गेल्या आठवड्यात बेशकिंमती धातुत मोठी वाढ झाली होती. तर आता दोन्ही धातुच्या किंमती घसरल्या. सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले. तर चांदीत मोठी घसरण दिसली.

Gold Silver Rate Today 22 December 2024 : सोने-चांदीची स्वस्ताई, आठवड्याच्या अखेरीस अशा कमी झाल्या किंमती
सोने आणि चांदीची किंमत
| Updated on: Dec 22, 2024 | 8:34 AM
Share

या दोन आठवड्यात सोने आणि चांदीत मोठी पडझड झाली. गेल्या आठवड्यात जितकी किंमत वाढली, तितकीच त्यात घसरण झाली. तर या आठवड्यात घसरणीचे सत्र दिसून आले. वर्षाअखेरीस या मौल्यवान धातुत अजून किती घसरण होते हे लवकरच समोर येईल. तर काही तज्ज्ञ दोन्ही धातुत वाढ होण्याची शक्यता वर्तवत आहेत. या दोन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले. तर चांदीत मोठी घसरण दिसली. चांदी 7 हजारांनी उतरली. आता अशा आहेत या बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 21 December 2024 )

सोन्यात मोठी पडझड

गेल्या आठवड्यात सोन्याने 1700 रुपयांची दरवाढ नोंदवली होती. तर किंमती 1600 रुपयांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी उतरले. मंगळवारी सोने 110 रुपयांनी वधारले, बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण आली. गुरुवारी सोने 710 रुपयांनी स्वस्त झाले. तर 20 डिसेंबर रोजी 330 रुपयांनी किंमती उतरल्या. काल भाव जैसे थे होते. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत स्वस्ताई

गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी वधारली होती. तर 5 हजारांनी स्वस्त झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत बदल झाला नाही. अखेरच्या टप्प्यात गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस एकूण दोन हजारांनी किंमत उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,377, 23 कॅरेट 75,075, 22 कॅरेट सोने 69,045 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,533 रुपये, 14 कॅरेट सोने 44,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,133 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?