AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 May 2024 : सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता, मोठ्या उसळीनंतर ग्राहकांना आता हाच दिलासा

Gold Silver Rate Today 22 May 2024 : सोने आणि चांदीने मे महिन्यात विसावा घेतल्यानंतर मोठी भरारी घेतली. सोने 75 हजारांच्या घरात तर चांदीची लाखाकडे वाटचाल सुरु झाली आहे. मौल्यवान धातूंनी मोठी भरारी घेतली. आता किंमतीत घसरण आली आहे.

Gold Silver Rate Today 22 May 2024 : सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता, मोठ्या उसळीनंतर ग्राहकांना आता हाच दिलासा
सोने आणि चांदीत स्वस्ताई
| Updated on: May 22, 2024 | 8:34 AM
Share

मार्च आणि एप्रिलमधील दरवाढीची कसर मे महिन्यात आता भरुन निघाली. किंमतीत एकदम जोरदार वाढ झाली. सुरुवातीच्या 15 दिवसांत दोन्ही धातूत चढउताराचे सत्र होते. आता मौल्यवान धातूंनी जोरदार घौडदौड केली. सोने 75 हजारांच्या घरात तर चांदीची लाखाकडे वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या सहा महिन्यात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 12 हजारांहून अधिक वाढले. तर चांदीने पण मोठा पल्ला गाठला. चांदी किलोमागे 20 हजारांनी वधारली. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 22 May 2024 )

दरवाढीला ब्रेक

सोन्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 2 हजारांनी वाढली. तर 770 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यात सोने 75 हजारांच्या घरात पोहचले. पहिल्या दिवशी सोने 500 रुपयांनी वधारले. तर मंगळवारी 21 मे रोजी 650 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी दोन हजारांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात चांदी जवळपास 7,000 रुपयांनी महागली. तर 500 रुपयांचा ग्राहकांना दिलासा मिळाला होता. 18 मे रोजी किंमती 3900 रुपयांनी वधारल्या. तर 20 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मुसंडी मारली. 21 मे रोजी किंमतीत 1900 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 74,214 रुपये, 23 कॅरेट 73,917 रुपये, 22 कॅरेट सोने 67,980 रुपये झाले. 18 कॅरेट 55,661 रुपये, 14 कॅरेट सोने 43,415 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,873 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी