AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीदारांना पुन्हा झटका, सोने-चांदी झाले महाग

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी आघाडी घेतल्याने किंमतींनी आस्मान गाठले आहे. त्यामुळे ग्राहकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. दिवाळीनंतर सोने-चांदीच्या किंमतींमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरेदीसाठी आलेल्यांचा मोठा हिरमोड झाला. इतक्या वाढल्या किंमती

Gold Silver Rate Today : खरेदीदारांना पुन्हा झटका, सोने-चांदी झाले महाग
| Updated on: Nov 22, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : गेल्या आठवड्यात सोने-चांदीने जोरदार उडी मारली. भाव वाढल्याने ग्राहकांना फटका बसला. गेल्या आठवड्यात सोन्याने 1200 रुपयांची चढाई केली. तर चांदीने 4100 रुपयांची झेप घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती थोड्याफार घसरल्या. पण मंगळवारी सोने-चांदीत जोरदार वाढ झाली. या दरवाढीने काल बाजारात खरेदीदारांची घोर निराशा झाली. 24 कॅरेट सोन्याने आता 62 हजारांकडे आगेकूच केली आहे. तर चांदीने (Gold Silver Price Today 22 November 2023) मोठी झेप घेतली आहे. दरवाढ झाल्यास सराफा बाजाराकडे सामान्य ग्राहक पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

सोने वधारले

या दिवाळीत सोन्यात दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात तीन दिवसांत किंमतीत जवळपास 1200 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली. 21 नोव्हेंबर रोजी भाव 380 रुपयांनी वाढले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी महागली

गेल्या आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली होती. चांदी 4100 रुपयांनी वाढली होती. 15 नोव्हेंबर रोजी किंमती थेट 1700 रुपयांनी वधारल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक लागला. पण 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,400 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,250 रुपये, 23 कॅरेट 61,005 रुपये, 22 कॅरेट सोने 56,105 रुपये झाले. 18 कॅरेट 45,938 रुपये, 14 कॅरेट सोने 35,831 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,729 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना