AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 23 August 2024 : गुडन्यूज, 10 ग्रॅम सोन्यासाठी आता इतके कमी मोजा पैसे, चांदी पण नरमली, काय आहेत आता किंमती

Gold Silver Rate Today 23 August 2024 : आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने नरमाईचा सूर आळवला. या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी तर सोने 600 रुपयांनी वधारले होते. आता सोने स्वस्त झाले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून चांदीत नरमाईचे सत्र आहे.

Gold Silver Rate Today 23 August 2024 : गुडन्यूज, 10 ग्रॅम सोन्यासाठी आता इतके कमी मोजा पैसे, चांदी पण नरमली, काय आहेत आता किंमती
सोने चांदीचा भाव
| Updated on: Aug 23, 2024 | 8:26 AM
Share

या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने नरमाईचा सूर आळवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत मोठा बदल झाला नाही. नंतर भावात वाढ झाली. सोन्याने 550 रुपयांची झेप घेतली तर चांदी 1,000 रुपयांनी वधारली होती. त्यानंतर किंमतीत मोठा बदल दिसला नाही. आता गुरुवारपासून सोन्यात नरमाईचे सत्र आहे. चांदीची किंमत स्थिर आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूचे भाव (Gold Silver Price Today 23 August 2024 )

सोन्याचा भाव उतरला

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. तर 20 ऑगस्ट रोजी 120 रुपयांची घसरण झाली. 21ऑगस्ट रोजी सोने अनुक्रमे 550 वधारले. तर 22 ऑगस्ट रोजी सोन्यात 380 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरणीचे संकेत दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव स्थिर

गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची मुसंडी मारली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत कोणताच बदल दिसला नाही. 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात चांदीने घसरणीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,599, 23 कॅरेट 71,312, 22 कॅरेट सोने 65,585 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,699 रुपये, 14 कॅरेट सोने 41,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक