AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | खुशखबर! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, इतके झरझर उतरले भाव

Gold Silver Rate Today 23 February 2024 | सराफा बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोमवारपासून सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. एका दिवसाआड मौल्यवान धातूचे भाव कमी-अधिक होत आहे. आता किंमतीत घसरण झाली आहे. चांदीची किंमत दणकावून आपटली. तर सोन्याने पण दिलासा दिला.

Gold Silver Rate Today | खुशखबर! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, इतके झरझर उतरले भाव
सोन्याची स्वस्ताई, चांदीचा वाढला तोरा
| Updated on: Feb 23, 2024 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 23 February 2024 : सराफा बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठा दिलासा दिला होता. पण या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. एक दिवस भाव वाढतो तर दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण पाहायला मिळते. जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. एक दिवसाआड किंमतीत फरक दिसत असल्याने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना कडू-गोड अनुभव येत आहे. दोन्ही धातूच्या किंमतीत घसरण झाली आहे. आता अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 23 February 2024)

सोन्याचा भाव उतरला

गेल्या आठवड्यात सोन्यात स्वस्ताईचे सत्र होते. तर या आठवड्यात सोन्यात चढउतार दिसून आला. 16 फेब्रुवारीला 200 तर 17 फेब्रुवारीला 100 रुपयांची वाढ झाली. 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाला. 21 फेब्रुवारी रोजी सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत आपटी बार

चांदीत या महिन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे 1100 आणि 900 रुपयांनी चांदी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी चांदीत 700 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,155 रुपये, 23 कॅरेट 61,906 रुपये, 22 कॅरेट सोने 56,934 रुपये झाले. 18 कॅरेट 46,616 रुपये, 14 कॅरेट सोने 36,361 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,396 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा