Gold Silver Rate Today 24 January 2025 : ग्राहकांच्या खिशाला झळ की दिलासा? सोने-चांदीची काय वार्ता

Gold Silver Rate Today 24 January 2025 : गेल्या दहा दिवसात सोन्याने गरुड झेप घेतली आहे. सोन्यात 2500 रुपयांची दरवाढ नोंदवण्यात आली. तर चांदीने मोठा ब्रेक घेतला आहे. चांदी सुस्तावली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 24 January 2025 : ग्राहकांच्या खिशाला झळ की दिलासा? सोने-चांदीची काय वार्ता
सोने-चांदीची किंमत काय?
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 8:31 AM

गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत तुफन आले आहे. सोने 2500 रुपयांहून अधिकने महागले आहे. तर वेगवान ट्रेनमधून चांदी उतरली आहे. चांदीत या आठवड्यात कोणतीही दरवाढ झालेली नाही. चांदी सुस्तावली आहे. सुरुवातीच्या दोनच दिवसात सोन्याने हजार रुपयांची झेप घेतली आहे. ऐन लग्नसराईत सोने महागले आहेत. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 24 January 2025 )

सोन्याची विश्रांती

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते. तर आता दोन दिवसात सोने हजारांनी वधारले. सोमवारी 120 रुपये तर 22 जानेवारी रोजी 860 रुपयांनी किंमती उसळल्या. त्यानंतर सोन्यात काल कोणतीही वाढ दिसली नाही. आज सकाळी घसरणीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा दरवाढीला ब्रेक

गेल्या आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. 18 जानेवारीपासून आतापर्यंत चांदीत कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,039, 23 कॅरेट 79,719, 22 कॅरेट सोने 73,316 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,029 रुपये, 14 कॅरेट सोने 46,823 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,633 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.