AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 24 July 2024 : Budget 2024 ने केला चमत्कार; सोने आणि चांदीचा भाव इतक्या हजाराने घसरला, काय आहेत किंमती आता

Gold Silver Rate Today 24 July 2024 : सीमा शुल्क कपातीचा निर्णय बजेटमध्ये घेण्यात आला. त्याचा मोठा फायदा सराफा बाजाराला झाला. ग्राहकांना आता स्वस्तात सोने-चांदी खरेदीची संधी मिळाली आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 24 July 2024 : Budget 2024 ने केला चमत्कार; सोने आणि चांदीचा भाव इतक्या हजाराने घसरला, काय आहेत किंमती आता
Gold And Silver Price Today
| Updated on: Jul 24, 2024 | 8:31 AM
Share

गेल्या गुरुवारपासून सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठी शांतता आहे. त्यात 23 जुलै रोजी सादर झालेल्या बजेटमध्ये या सराफा बाजाराला मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपातीचा निर्णय जाहीर केला. जानेवारी 2024 मध्ये कस्टम ड्युटी 15 टक्के करण्यात आली होती. ती आता 6 टक्क्यांवर आणण्यात आली. या घोषणेनंतर देशभरातली सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती दणकावून आपटल्या. या दणआपटमुळे सराफा बाजारात सध्या चैतन्य आले आहे. ग्राहकांना हे धातू खरेदी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. त्यांची चांदी होणार आहे. आता काय आहेत बेशकिंमती धातूची किंमत? (Gold Silver Price Today 24 July 2024 )

सोन्याचा तोरा उतरला

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरु आहे. 18 जुलैपासून दरवाढीला ब्रेक लागला आहे. 22 जुलै रोजी सोने 120 रुपयांनी उतरले. 23 जुलै रोजी त्यात 300 रुपयांची घसरण झाली. आयात शुल्कातील कपातीमुळे किंमतीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली आहे. तर आजही सकाळच्या सत्रात सोन्याने घसरणीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी दणआपट

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी मुसंडी मारली होती. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 5,000 रुपयांची स्वस्ताई आली होती. सोमवारी किंमती स्थिर होत्या. तर 23 जुलै रोजी बजेटमध्ये सीमा शुल्कात कपातीचा निर्णय होताच, चांदी 3,500 रुपयांनी घसरली. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,218 रुपयावरुन थेट 69,602, 23 कॅरेट 72,925 रुपयांहून 69,323, 22 कॅरेट सोने 67,068 रुपयांहून 63,755 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट 54,914 नाही तर आता 52,202 रुपये, 14 कॅरेट सोने 42,833 रुपये आता 40,717 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 88,196 रुपयांहून आता 84,919 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.