AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 24 November 2024 : सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; चांदीने घेतली माघार, सराफा बाजारात भाव तरी काय?

Gold Silver Rate Today 24 November 2024 : सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यात मोठा दिलासा दिला होता. तर या आठवड्यात सोने 3 हजारांनी महागले तर चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली. सोन्यात सलग दरवाढ दिसून आली. तर चांदीने ब्रेक घेतला. सध्या जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातुवर दिसत आहे.

Gold Silver Rate Today 24 November 2024 : सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; चांदीने घेतली माघार, सराफा बाजारात भाव तरी काय?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Nov 24, 2024 | 8:30 AM
Share

सराफा बाजारात सोन्याने दरवाढीचा गुलाल उधळला तर चांदीने आठवड्याच्या अखेरीस दरवाढीच्या मैदानातून माघार घेतली. या आठवड्यात सोने 3 हजार रुपयांनी वधारले. तर चांदी 2500 रुपयांनी महागली आहे. सोमवारपासून सोने सातत्याने वधारले आहे. तर चांदीने आठवड्याच्या अखेरीस भाव वाढीला ब्रेक दिला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातुच्या किंमतींवर दिसत आहे. सोने आणि चांदीचा आता असा आहे भाव (Gold Silver Price Today 24 November 2024 )

सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल

मागील आठवड्यात सोन्याला सूर गवसला नव्हता. गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर या आठवड्यात सोन्याने 3 हजारांची उसळी घेतली. 18 नोव्हेंबर रोजी सोने 660, मंगळवारी 760 रुपयांची तर बुधवारी सोन्याने 550 रुपयांची उसळी घेतली. 21, 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 330, 870 रुपयांची मुसंडी सोन्याने मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2500 रुपयांनी वधारली

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 2500 रुपयांची झेप घेतली 19 नोव्हेंबर रोजी चांदी 2 हजार रुपयांनी वधारली. 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. त्यानंतर चांदीत कोणताच मोठा बदल दिसला नाही. या तीन दिवसांत चांदीत मोठा उलटफेर झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,787, 23 कॅरेट 77,475, 22 कॅरेट सोने 71,253 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,340 रुपये, 14 कॅरेट सोने 45,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,850 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!