Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale : कर्मा ऑलवेज बॅक… निकाल लागताच उदयनराजे भोसले यांचा शरद पवार यांना खोचक टोला

Udayanraje Bhosale attack on Sharad Pawar : उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे त्यांचे भाकीत खरं ठरलं. यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी शरद पवार यांना जोरदार तडाखा दिला. त्यांनी त्यांचावर पुन्हा एकदा टीका केली.

Udayanraje Bhosale : कर्मा ऑलवेज बॅक... निकाल लागताच उदयनराजे भोसले यांचा शरद पवार यांना खोचक टोला
कर्मा ऑलवेज बॅक
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 5:15 PM

महायुतीची राज्यात त्सुनामी आल्यानंतर गोटात एकच जल्लोष आहे. शहराशहरात, गावागावात विजयाचा जल्लोष सुरू आहे. तर दुसरीकडे छत्रपती उदयनराजे यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे त्यांचे भाकीत खरं ठरलं. सातारा-जावळीत शिवेंद्रसिंहराजे भोसले निवडून येतील हे असे ते म्हणाले होते. यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी शरद पवार यांना जोरदार तडाखा दिला. त्यांनी त्यांचावर पुन्हा एकदा टीका केली.

हा शिवाजी महाराजांचा विजय

त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील महायुतीचा विजय हा छत्रपती शिवाजी महाराजां विचाराचा विजय आहे. त्यांना मंत्रिपद मिळणारच मिळाल्यातच जमा आहे. महाविकास आघाडीने राजकारण विसरून जावं, असा टोला सुद्धा त्यांनी हाणला. महाविकास आघाडी निवडून येणार नाही हे भाकीत त्यांनी एक दिवसापूर्वीच वर्तवलं होतं. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार दिमाखात येणार हे त्यांनी सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

कर्मा ओल्व्हेज बॅक

लोकशाहीत मतदारांनी योग्य निर्णय घेतला, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. गेल्या काही वर्षांपासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात विस्तव जात नाही. शरद पवारांचा करिष्मा कधीच नव्हता. पायात पाय घालण्याचे काम केलं त्याचा हा परिणाम आहे, असा चिमटा त्यांनी काढला. करणी तशी भरणी आणि कर्मा ओल्व्हेज बॅक अशी घणाघाती टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. त्यांनी यापूर्वी जी पेरणी केली, तसंच त्यांच्यासोबत घडल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत मोठे यश आले होते. पण विधानसभेत अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्यापेक्षा उजवी ठरली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी 38 जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या आहेत.

शिवेंद्रराजे पुष्पा

महायुतीला मिळालेलं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आहे. महायुतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणल्यामूळं हा विजय आहे, असे उदयनराजे म्हणाले. तर शिवेंद्रराजे हे आमचे पुष्पा असल्याचे ते म्हणाले. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील समीकरण हे सुद्धा या निमित्ताने चर्चेचा विषय ठरले आहे. दोघांच्या समर्थकांत दोन दिवसांपूर्वी चांगलाच राडा झाला होता.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.