Gold Silver Rate Today : सोने-चांदीत तेजीचे सत्र कायम, लवकरच करणार रेकॉर्ड

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत तेजीचे सत्र कायम आहे. दिवाळीपासून या तेजीला किरकोळ ब्रेक लागला आहे. सोने-चांदीच्या यापूर्वीचा उच्चांक गाठण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार या वर्षी 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. हा रेकॉर्ड लवकरच मोडण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत तेजीचे सत्र कायम, लवकरच करणार रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 8:31 AM

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीतील दरवाढ ग्राहकांच्या जीवाला घोर लावत आहे. गेल्या 10 वर्षात सोने-चांदीने घेतलेली ही भरारी सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. सोने दुप्पटीहून पुढे सरकले आहे. तर कोरोनानंतर पण दरवाढीला ब्रेक लागलेला नाही. चढउताराचे सत्र सोडले तर मौल्यवान धातूंनी मोठा पल्ला गाठला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूच्या किंमती उतरल्या होत्या. दिवाळीपासून तेजीचे सत्र कायम आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदावर विरजण पडले आहे. गुंतवणूकदारांनी मात्र या दोन आठवड्यात मोठी कमाई केली आहे. सोने 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहे. सोने-चांदीत (Gold Silver Price Today 25 November 2023) अशी भाव वाढ झाली आहे.

सोन्यात किंचित घसरण

सोने गेल्या 10 दिवसांत 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 22 नोव्हेंबर रोजी भावा स्थिर होता. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांची चांदी

दोन आठवड्यात गुंतवणूकदारांची चांदी झाली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.